Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रात्री कोणत्या कुशीवर झोपणे योग्य आहे विशेष लेख

रात्री कोणत्या कुशीवर झोपणे योग्य आहे विशेष लेख
Webdunia
शुक्रवार, 7 मे 2021 (21:26 IST)
चांगल्या आरोग्यासाठी चांगली झोप पाहिजे.परंतु आपल्याला हे माहित आहे की  आपल्या झोपण्याचा आपल्या आरोग्यावर देखील प्रभाव पडतो . चला तर जाणून घेउ का की कोणत्या कुशीवर झोपणे योग्य आहे. 
इथे आपण डाव्या कुशीवर झोपण्याचे फायदे जाणून घेत आहोत 
 
1 आरोग्याच्या दृष्टीने डाव्या कुशीवर झोपणे खूप चांगले आहे. या मुळे आपल्या हृदयावर जास्त दबाव पडत नाही आणि ते अधिक चांगले कार्य करण्यास सक्षम होतं या मुळे आपण दीर्घकाळ निरोगी राहतं.
 
2 अशाप्रकारे रक्तासह ऑक्सिजनचा प्रवाह शरीराच्या विविध अवयवांमध्ये आणि मेंदूत योग्यप्रकारे केला जातो आणि शरीरातील सर्व अवयव निरोगी राहतात आणि चांगल्या प्रकारे कार्य करतात.
 
3 गरोदर स्त्रियांसाठी डाव्या कुशीला झोपणे उत्तम असते. कारण या मुळे तिच्या बाळाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होत नाही. या शिवाय टाचांना,हात,पायाला सूज येण्याची कोणतीही समस्या होत नाही. 
 
4 डाव्या कुशीवर झोपल्याने शरीरात रक्ताभिसरण चांगले होऊन झोप चांगली येते. अशा प्रकारे झोपल्यावर थकवा जाणवत नाही आणि पोटाचे त्रास कमी होतील. 
 
5 अशा प्रकारे झोपल्याने अन्नाचे पचन चांगले होते. पचन तंत्रावर कोणताही अतिरिक्त दबाब नसतो. डाव्या कुशीवर झोपल्याने शरीरात साचलेले विष लसीका प्रणाली द्वारे बाहेर काढले जाते. 
 
6 वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास डाव्या कुशीला झोपल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो. या गुरुत्वाकर्षणामुळे, अन्न लहान आतड्यातून अगदी आरामात मोठ्या आतड्यापर्यंत पोहोचते आणि सकाळी पोट स्वच्छ होण्यास सहज होते. 
 
7 अशा प्रकारे झोपल्याने पोटातील आम्ल वर येण्या ऐवजी खालीच राहते या मुळे ऍसिडिटी आणि छातीत जळजळ होत नाही. बऱ्याच वेळा योग्य प्रकारे न झोपल्याने देखील ऍसिडिटीचा त्रास उद्भवतो.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

कन्यादान विधी

येथे स्मशानभूमीत चितेच्या राखेसह होळी खेळली जाते, महादेवाशी संबंधित या सणाचे रहस्य आणि महत्त्व जाणून घ्या

होळीला होणार वर्षातील पहिले चंद्रग्रहण सुतक काळ जाणून घ्या

फक्त या दोन गोष्टी तुमच्या चेहऱ्याच्या नैसर्गिक सौंदर्याचे रहस्य बनू शकतात

ज्येष्ठमध चावल्याचे 3 फायदे जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

श्री अक्षरावरून मुलांची नावे अर्थासकट

मसालेदार चिकन कॉर्न सूप

World Consumer Day 2025 जागतिक ग्राहक दिन माहिती

पौष्टिक मेथीचे पराठे रेसिपी

Career Tips: आरोग्य क्षेत्रात करिअर करून चांगला जॉब मिळवा

पुढील लेख
Show comments