rashifal-2026

कामाच्या व्यापात व्यायामाला वेळ मिळत नाही? मग या 13 सोप्या गोष्टी करून पाहा

Webdunia
शनिवार, 15 जुलै 2023 (15:32 IST)
डॉ. अविनाश भोंडवे
 
Try these 13 simple things आहार, व्यायाम आणि झोप या आरोग्यासाठी अत्यावश्यक असणाऱ्या तीन गोष्टी असतात. आजच्या भागमभाग जीवनशैलीत जेवण उशीरा का होईना किंवा दोनदा का होईना होते.
 
झोप कमी जास्त प्रमाणात रोजच घेतली जाते. पण व्यायामाचे तत्त्व मात्र बहुसंख्य व्यक्तींच्या वेळेत बसत नाही.
 
या तीनही गोष्टींनी वजनवाढ होते आणि मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, हाडांचे आजार उद्भवतात.
 
वैद्यकीय शास्त्रातील आडाख्यांनुसार, प्रत्येक प्रौढ माणसाने, रोज किमान 25 मिनिटे मध्यम तीव्रतेचा व्यायाम, म्हणजे भरभर चालणे, पोहणे, सायकल चालवणे करणे अत्यावश्यक असते.
 
तरीही आजच्या कार्यप्रवण जीवनशैलीत, इच्छा आणि गरज असूनही व्यायाम करणे शक्य होत नाही.
 
पण खालील 13 गोष्टींकडे आपण लक्ष पुरवलेत, तर ही बैठी जीवनशैली, काही प्रमाणात का होईना आपण गतिमान करू शकतो आणि वजनवाढ व पर्यायाने अनेक आजार दूर ठेवू शकतो-
 
1. घरापासून जवळच्या ठिकाणी किराणा माल, भाजी आणायला पायी जा. साधारणतः 2 किलोमीटरच्या आत असलेल्या ठिकाणी पायी जा आणि पायी या.
 
2. कामाला जाताना बसने जात असाल, तर एक स्टॉप आधी उतरा आणि तिथून ऑफिसला पायी जा. येतानाही असेच घराच्या आधीच्या एका स्टॉपवर उतरा.
 
3. ऑफिसमध्ये आणि इतरत्र लिफ्ट ऐवजी जिने वापरा. जर आपले ऑफिस 10व्या मजल्यावर असेल तर लिफ्ट चौथ्या मजल्यावर पकडा. ऑफिसला लोकलने जात असाल, आणि ऑफिस जर लोकल स्टेशनपासून २ किलोमीटर अंतराच्या आत असेल तर तिथून पायीपायी जा.
 
4. ऑफिसमध्ये बैठे काम असेल तर दर एका तासाने पाणी पिण्याचा किंवा टॉयलेट ब्रेक घ्या.
 
5. जर तुमचे काम सतत संगणकापुढे बसून करण्याचे असेल, तर शक्य असल्यास ऑफिसकडून उभे राहून काम करण्याचे टेबल मागवा. उभे राहिल्याने बसण्यापेक्षा जास्त कॅलरीज खर्च होतात.
 
जर अशी सोय होत नसेल तर, तुमच्या कामातील संगणकावर करण्याच्या काही गोष्टी उभे राहून करा.
 
6. आपण रांगेत उभे असाल, तर दोन मिनिटे एका पायावर आणि नंतर दोन मिनिटे दुसऱ्या पायावर उभे राहा.हळू हळू हा दोन मिनिटांचा वेळ वाढवत जा.
 
7. कामावर काम करत असताना, पाय ताणणे. घोटे वळवणे, पायांची बोटे वरखाली करणे असे व्यायाम करत राहावे.हेच व्यायाम घरी टीव्ही बघताना किंवा सोफ्यावर बसल्यावर करावे.
 
8. सुट्टीच्या दिवशी घरी झोपून राहण्याऐवजी जवळच्या डोंगराळ भागात किंवा गावात जावे. तिथे टेकडी चढणे-उतरणे.अशा अॅक्टिव्हिटीज कराव्यात. महिन्यातून दोन वेळा तरी असे बाहेर जाऊन स्व‍च्छंद फिरावे.
 
9. ऑफिसमध्ये तुमच्या सहकाऱ्यांशी बोलायला, फोन वापरू नका, त्यांना चालत जाऊन भेटा. तसेच तुम्हाला कुणी बाहेरील व्यक्ती भेटायला आली, तर त्याला बाहेर पॅसेजमध्ये किंवा कॉन्फरन्स रूमध्ये घेऊन जा.
 
10. सुटीच्या दिवशी शॉपिंगला गेलात तर तिथेही आपले वाहन थोडे दूरच लावा आणि दुकानात पायी जा.
 
11. ऑफिसमध्ये लंच ब्रेकनंतर अर्धा तास पायी फिरून या.
 
12. जर शक्य असेल, तर घरी दहा मिनिटे सूर्यनमस्कार घालावेत. जागा असेल तर एक्झरसाईझ सायकल घ्यावी. ती वेळ मिळेल तशी , कधी सकाळी तर कधी संध्याकाळी ३० मिनिटे वापरावी.
 
13. घरी छोट्या मुलांना खेळवणे, बागकाम करणे, घराची स्वच्छता, झाडणे-पुसणे यातही थोडा व्यायाम होतो.
 
‘थेंबे थेंबे तळ साचे’ अशी मराठीमध्ये म्हण आहे. व्यायामाच्या बाबतीत या गोष्टी थेंबासारख्या वाटतील, पण आरोग्यावर त्याचा दीर्घकालीन परिणाम नक्कीच सकारात्मक असेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भिकाऱ्याने दान विकून दारू पिल्यास दात्याला दोष लागतो का?, प्रेमानंद महाराज काय म्हणाले जाणून घ्या

Christmas 2025 Essay in Marahti नाताळ निबंध मराठी

सुंदर त्वचेसाठी तांदळाचे पीठ अशा प्रकारे वापरा, पद्धत जाणून घ्या

हिवाळ्यात ब्रोकोली खाणे अत्यंत फायदेशीर आहे आरोग्य फायदे जाणून घ्या

जोडीदार भावनिक छळ तर नाही करत आहे, अशा प्रकारे ओळखा

सर्व पहा

नवीन

Christmas special recipe Plum cake ख्रिसमस फ्रूट केक

जोडीदारासमोर पादणे हे खर्‍या रिलेशनशिपची लक्षण आहेत का?

दररोज गरम पाण्याने आंघोळ करणे शरीरासाठी हानिकारक आहे, दुष्परिणाम जाणून घ्या

सरकारी संस्थांमध्ये व्यवस्थापन प्रशिक्षणार्थी पदांसाठी भरती सुरू, पात्रता जाणून घ्या

कच्च्या दुधाचा फेस पॅक चेहऱ्यावर चमक आणेल, असे वापरा

पुढील लेख
Show comments