Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

High Protein Food: शरीरातील प्रथिनांची कमतरता पूर्ण करण्यासाठी आहारात हे पदार्थ समाविष्ट करा

Webdunia
रविवार, 17 ऑक्टोबर 2021 (17:53 IST)
प्रथिने शरीरासाठी खूप फायदेशीर असतात. हे त्या घटकांमध्ये असते जे शरीर निरोगी ठेवण्यास मदत करतात. 
प्रथिने ऑक्सिजन, हायड्रोजन आणि नायट्रोजनपासून बनलेले असतात, ते  शरीराच्या पेशी बनवण्यास मदत करतात. हे आपल्या शरीराचे स्नायू बनवण्यासाठी देखील मदत करते (Protein For Healthy Muscles) . प्रथिनांच्या कमतरतेमुळे अनेक आजार होऊ शकतात. चला जाणून घेऊया त्या पदार्थांविषयी, जे शरीरातील प्रथिनांच्या कमतरतेला दूर करू शकतात. ते पदार्थ म्हणजे-
 
1 दुधापासून बनवलेल्या गोष्टी -दुध (डेअरी उत्पादने) प्रथिने हा एक चांगला स्रोत मानला जातो. त्यात दूध, पनीर, खवा,चीज समाविष्ट आहे. प्रथिनांसह, हे शरीरातील कॅल्शियमची कमतरता पूर्ण करण्यास देखील मदत करतात. यासह, हे शरीराची प्रतिकारशक्ती देखील वाढवतात.
 
2 आहारात अंडी समाविष्ट करा-अंडी हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत मानले जातात. हे केवळ प्रथिनेच नव्हे तर कॅल्शियम आणि ओमेगा -3 फॅटी ऍसिड (Omega-3 Fatty Acid)देखील समाविष्ट आहे जे शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहण्यास मदत करू शकतात.
 
 
3 ड्राय फ्रुट्सचे सेवन करा-ड्राय फ्रुट्स प्रथिनांचे खूप चांगले स्रोत मानले जातात. पिस्ता, मनुका, बदाम, काजू, अक्रोड यांचे दररोज सेवन केल्याने, प्रथिनांसह, आपल्याला व्हिटॅमिन, सोडियम आणि पोटॅशियम(Potassium Source Food) देखील मिळतात. हे सर्व शरीरातील सर्व पोषक घटकांची कमतरता दूर करून शरीराला निरोगी बनविण्यात मदत करतात.
 
4 कोरड्या चेरीचे सेवन करा-जर आपल्याला शरीरात जळजळ आणि संधिवाताच्या दुखण्याचा त्रास होत असेल तर आपण आपल्या आहारात नक्कीच चेरीचा समावेश केला पाहिजे. या मध्ये अँटी इंफ्लिमेंट्री गुणधर्म शरीराची सूज कमी करतात आणि शरीरातील प्रथिनांची कमतरता दूर करण्यास मदत करतात.
 
5 आहारात बदामांचा समावेश  करा-बदाम हे प्रथिनांचे खूप चांगले स्त्रोत मानले जातात. डॉक्टर दररोज 5 ते 6 बदाम खाण्याची शिफारस करतात. हे केवळ प्रथिनांची कमतरता पूर्ण करत नाही तर हिवाळ्यात शरीराला गरम ठेवण्यास मदत करतात.
 
6 माशांचे सेवन करा-जर आपण मांसाहार खात असाल तर माशांचे सेवन आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सॅल्मन फिश(Salmon Fish) आणि टूना फिश (Tuna Fish) हे प्रथिनांचे सर्वोत्तम स्त्रोत मानले जातात. यासह या मध्ये  चिकनपेक्षा कमी चरबी आढळते, जी शरीरासाठी खूप फायदेशीर आहे.
 
अस्वीकरण: हा लेख आपल्या माहिती साठी आहे,या लेखात नमूद केलेल्या विविध पद्धतीची पुष्टी वेबदुनिया करत नाही,कोणतेही उपचार,औषधोपचार पदार्थांचा सेवन करण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा परामर्श घ्यावा.
 
 

संबंधित माहिती

मोशी होर्डिंग कोसळल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल

iQOO Z9x 5G: सर्वात स्वस्त गेमिंग स्मार्टफोन उत्तम वैशिष्ट्येसह लॉन्च

महाराष्ट्र गद्दारांना कधीच माफ करणार नाही म्हणत उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

स्वातीनंतर आता बिभव कुमारने तक्रार नोंदवली, म्हणाले केजरीवालांना अडकवणं मालिवाल यांचा हेतू

मनिका बत्रा आणि शरथ कमल पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय महिला आणि पुरुष संघाचे नेतृत्व करतील

लिक्विड लिपस्टिक सहज काढत नाही? या हॅकच्या मदतीने हे काम 1 मिनिटात होईल

तुम्ही निरोगी आहात की नाही हे कसे ओळखावे? आयुर्वेद निरोगी राहण्यासाठी हे 5 चिन्हे सांगते

शनि साडेसाती चिंतन कथा

Sleep Divorce कपल्समध्ये स्लीप डिव्होर्सचा ट्रेंड, जाणून घ्या फायदे आणि तोटे

Chilled Beer फक्त थंडीतच बिअरची चव चांगली का लागते? याचे कारण संशोधनातून समोर आले

पुढील लेख
Show comments