Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑक्सिजनची पातळी कायम ठेवण्यासाठी आहारात या 5 गोष्टी समाविष्ट करा

Webdunia
शुक्रवार, 14 मे 2021 (19:25 IST)
कोरोनाकाळात जीवनशैलीत बदल दिसून येत आहे. कदाचित भविष्यात या मध्ये आणखी बदल होतील. कोरोना साथीच्या आजारात, लोकांच्या खाण्या-पिण्याच्या सवयीमध्ये मोठा बदल झाला आहे. लोक त्यांच्या आरोग्याबद्दल अधिक जागरूक होत आहेत. या साथीच्या आजाराच्या वेळी आपली ऑक्सिजन पातळी सामान्य कशी ठेवावी जाणून घेऊ या.  
 
1 लिंबू- लिंबू हे व्हिटॅमिन सी चा चांगला स्रोत आहे. त्याच्या वापरामुळे प्रतिकारशक्ती वाढते . हे वजन कमी करण्यासाठी  देखील खूप उपयुक्त आहे. दररोज सकाळी कोमट पाण्यात लिंबू पिळून पिणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. लिंबू ऑक्सिजनची पातळी सामान्य ठेवण्यास मदत करते. हे एक नैसर्गिक एंटीसेप्टिक आहे.चेहऱ्यावरील पुळ्या, पुटकुळ्या, मुरूम, काळे डाग,सुरकुत्या कमी करण्यात मदत करतं.आपण लिंबाचं लोणचं देखील खाऊ शकता.
 
2 किवी -किवीला फळांचा राजा म्हणतात. त्यात असलेले व्हिटॅमिन सी,ई,पोटॅशियम आणि फोलेट बर्‍याच रोगांपासून बचाव करण्यास मदत करते. डेंग्यूसारख्या आजारात या फळाचे सेवन करण्यास सांगितले जाते. त्यात भरपूर अँटीऑक्सिडेंट असतात जे ऑक्सिजन सामान्य पातळी सामान्य  ठेवण्यास मदत करतात. तसेच त्यामध्ये उपस्थित घटक संसर्गासारख्या इतर आजारांपासून संरक्षण करण्यास मदत करतं. 
 
3 केळी- केळी खाल्ल्याने शक्ती मिळते, शरीरातील ऑक्सिजनची पातळी वाढविण्यास मदत होते.त्यात अल्कालाइन  मुबलक प्रमाणात आढळतात, जे ऑक्सिजनची कमतरता दूर करत.
 
4 लसूण - लसणाला आयुर्वेदिक औषधांमध्ये गणले जाते. भारतीय अन्नाची चव वाढविण्यासाठी याचा अधिक वापर केला जातो. तज्ञांच्या मते, लसणाचे सेवन केल्याने शरीरातील ऑक्सिजनची पातळी सामान्य राहण्यास मदत होते. एवढेच  नव्हे तर कोलेस्टेरॉलच्या आजार झाल्यास लसणाचे सेवन केले जाते. जेणेकरुन रक्त घट्ट होणार नाही.
 
5 दही - दह्याचे सेवन शरीरासाठी उत्तम आहे. या मध्ये व्हिटॅमिन,कॅल्शियम,प्रथिने आढळतात. दररोज जेवण्यात याचे सेवन करू शकता. या मुळे ऑक्सिजन ची कमतरता पूर्ण होते.
पचन शक्ती देखील मजबूत करते. रात्री दह्याचे सेवन करू नये. 
 हे शरीरासाठी दिवसात जेवढे चांगले आहे रात्रीच्या वेळी याचे सेवन करणे घातक आहे. 
 
टीप-  ही सर्व माहिती सर्वसाधारण मताच्या आधारे गोळा केली गेली आहे, अधिक माहितीसाठी, कृपया वैद्यकीय सल्ला आवर्जून घ्या.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मंदिरात जाण्यापूर्वी केस का धुवावेत ?

अभ्यासाचे टेबल कसे असावे? वास्तु टिप्स जाणून घ्या

योनिमार्गाच्या खाज सुटण्याने त्रास होतो का या 3 उपायांनी काही मिनिटांत आराम मिळेल

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

आरोग्यवर्धक व्हेजिटेबल ज्यूस

सर्व पहा

नवीन

पायांना मुंग्या आल्याने त्रास होतो का? रेस्टलेस लेग सिंड्रोमचे लक्षण असू शकतात

तुमचे नाते कमकुवत होत असल्याची लक्षणे जाणून घ्या

तेनालीराम कहाणी : महामूर्ख

कॅन्सरबद्दल लवकर कळेल, स्ट्रँडचे नवीन जीनोमिक्स डायग्नोस्टिक्स अँड रिसर्च सेंटर सुरू

Wedding Wishes in Marathi लग्नाच्या शुभेच्छा देणारे मराठी संदेश

पुढील लेख
Show comments