Festival Posters

फणसात असलेले गुणधर्म

Webdunia
सर्वात जास्त गर असलेले फळ म्हणजे फणस अशी फणसाची ओळख होऊ शकते. हे असं फळ किंवा अशी भाजी आहे ज्याचे अनेक आरोग्यवर्धक फायदे आपल्यातील अनेकांना ज्ञात नाहीत. आज आपण या फळाचे काही गुणकारी गुणधर्म जाणून घेऊया. 
 
फणसात अनेक पौष्टिक गुणधर्म असतात. व्हिटॅमिन ए, सी, थायमिन, पोटॅशियम, कॅल्शियम, लोह यांचा फणसात मोठय़ा प्रमाणात समावेश असतो.
 
पिकलेल्या फणसाचा पल्प करून तो पाण्यात उकळून ते पाणी प्यायल्यास ताजेतवाने तर वाटतेच, पण हृदयाचे विकार जडलेल्या व्यक्तींना त्याचा फायदाही होतो.
 
फणसात मोठय़ा प्रमाणावर असणारे पोटॅशिअम रक्तदाब कमी करण्यास मदत करत असल्याने हृदयावरील अनेक समस्यांवर उपायकारक ठरू शकतो.
 
भरपूर प्रमाणात लोह असल्याने अँनिमियासारख्या विकारांवर फणस खाणे फायद्याचं ठरतं.

थायरॉईडचा त्रास असणार्याा लोकांनी फणस खाणे फायद्याचे आहे. यात असलेले खनिज आणि तांबे थायरॉईड नियंत्रित करण्यास मदत करू शकतात.
 
हाडांसाठी फणस खाणे खूप गुणकारी असते. या फळात असलेले मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हाडांसाठी गुणकारी असते.
फणसात असलेले व्हिटॅमिन 'ए' आणि 'सी' रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास मदत करते. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनचा धोका यामुळे कमी होऊ शकतो.
 
फणसात असणारे व्हिटॅमिन 'ए' डोळ्यांची शक्ती चांगली ठेवते. तसेच त्वचा उजळण्यासाठीसुद्धा तो फायदेशीर ठरते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

स्वर्ग आणि नरक खरंच असतात का? जाणून घ्या सत्य

Wheat Storage Tips: अशा प्रकारे साठवा गहू; वर्षभर सुरक्षित राहील एकही कीड लागणार नाही

What is Box Breathing फक्त ४ सेकंदात मिळवा मानसिक शांती: जाणून घ्या बॉक्स ब्रीदिंगची जादू

एप्रिल ते जूनच्या सुट्ट्यांमध्ये भारतातील या अद्भुत सणांना आवर्जून भेट द्या; ज्यामुळे तुमची सहल अविस्मरणीय ठरेल

Salt vastu remedies घरात लोक सतत आजारी पडत असतील तर एकदा हे नक्की करुन बघा

सर्व पहा

नवीन

Beauty Tips :चमकदार आणि डागरहित त्वचेसाठी चारकोल फेस मास्क बनवा

पोटदुखी या 5 गंभीर समस्या होऊ शकतात

Benefites of Shalabhasana :शलभासन योगाचे फायदे जाणून घ्या

लघु कथा : खरी मित्रता

पुरणपोळी: इतिहास, परंपरा आणि सांस्कृतिक प्रवास

पुढील लेख
Show comments