Festival Posters

स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नियमित चाला

Webdunia
सोमवार, 10 डिसेंबर 2018 (09:06 IST)
वृद्धासांठी एक खुशखबर आहे. ज्या वृद्धांना विस्मृती किंवा स्मृतीभ्रंषाचा आजार आहे, त्यांना आपल्या आजारावर मात करण्यासाठी एक चांगला पर्याय उपलब्ध झाला आहे. तो पर्याय म्हणजे नियमित चालणे. नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार नियमित चालण्यामुळे वयोवृद्ध व्यक्तींची स्मरणशक्ती टिकून राहण्यास मदत झाल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. रहिवासी भागाचा परिणाम माणसाच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करत असल्याचा निष्कर्षही कंन्सास विद्यापीठाच्या या संशोधनावरून होत असल्याचंही समोर आलं आहे. 
 
संशोधकांच्या मते, चालण्यामुळे परिसरातील भौगोलिक माहिती आणि नकाशा डोक्यात फिक्स होते. त्यामुळे व्यक्तीला आपल्याला हवे असलेले ठिकाण किती अंतरावर आहे याचा अंदाज येतो. बर्‍याचदा व्यायामाला वेळ मिळत नसल्याची तक्रार अनेक जण करतात. मात्र व्यायामाऐवजी चालणे हा त्यावरचा एक उत्तम उपाय आहे. आरोग्य तज्ज्ञांच्या मते दीर्घकाळ आरोग्य चांगले राखण्यासाठी चालणे हाच सर्वोत्तम व्यायाम आहे. नियमित चालण्यामुळे तुमच्या अवयवांचा व्यायाम होतो. चालण्यामुळे शरीर मजबूत होण्यासाठी मदत तर होतेच शिवाय मनावरील तणाव कमी करण्यासाठीही याचा चांगला फायदा होतो. त्यामुळे ज्यांची स्मरणशक्ती कमी झाली आहे किंवा ज्यांना आपली स्मरणशक्ती आहे, तशी राखायची असल्यास आजपासूनच चालायला सुरूवात करायला हरकत नाही.
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

प्रत्येक घासात गोड-आंबट चव; नक्की बनवून पहा टोमॅटो ढोकळा रेसिपी

वाढते वजन कमी करण्यासाठी या टिप्स अवलंबवा

एमएससी इन पीडियाट्रिक नर्सिंग कोर्स मध्ये कॅरिअर करा

डेड स्किन काढण्यासाठी हा स्क्रब फायदेशीर आहे

लघु कथा : हत्ती आणि आंधळे माणस

पुढील लेख
Show comments