Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रेस्टॉरंटमध्ये चुकून ऑर्डर नका करू हे 7 पदार्थ

Webdunia
आपण बाहेर जाऊन खाण्यापिण्याचे शौकीन असाल तरी काही पदार्थ असे आहे जे चुकून ऑर्डर करू नये. हे पदार्थ खाल्ल्याने साइड इफेक्‍ट होतात. रेस्टॉरंटचे जेवण टेस्टी वाटत असले तरी ते नुकसानदायक आणि आरोग्यासाठी धोकादायक असतं. रेस्टॉरंटमध्ये जेवण तयार करताना स्वच्छतेकडे दुर्लक्ष केलं जातं. पदार्थांमध्ये वापरण्यात येणार्‍या वस्तूही फारश्या चांगल्या गुणवत्तेच्या नसतात. सर्व लोकं फॉर ए चेंज रेस्टॉरंटमध्ये जातात पण हे खास त्या लोकांसाठी आहे जे वारंवार चक्कर लावत असतात. पाहा कोणते आहे ते पदार्थ जे ऑर्डर करू नये:
फिश: रेस्टॉरंटमध्ये मिळणारी फिश फ्रेश तर निश्चितच नसते आणि व्यवस्थित स्वच्छ केलेलीही नसते. त्यात सूक्ष्म हाडं राहून जातात जे आपल्यासाठी नुकसानदायक आहे.

मंचूरियन: खाण्यात टेस्टी लागणार्‍या मंचूरियनमध्ये फुलकोबी, कोबी वापरली जाते. ज्यात अनेक जिवाणू असतात. रेस्टॉरंट चालवणारे निश्चितच आपल्यासारखे भाजी स्वच्छ करत नसतीलच. अशी भाजी खाऊन आपण आजारी पडू शकता. 
फ्राइड पदार्थ: किती मोठं रेस्टॉरंट असलं तरी फ्राइड आइटम्स वापरलेल्या तेलात तळले जातात. अनेकदा वापरलेल्या तेलात तयार केलेले पदार्थ खाल्ल्याने पोटदुखी आणि उलटी सारखे प्रकार होऊ शकतात. 

चाट: पाणी पुरी, दही पुरी, भेल किंवा इतर चाट ज्यात भाज्या, दही आणि पाणी वापरले जातं, असे पदार्थ टाळावे. यात रोग उत्पन्न करणार्‍या रोगजनक भरपूर प्रमाणात असतात. 
सलाड: सलाडमध्ये भाज्या आणि फळं धुतल्याविना सजवून दिल्या जातात. ‍अनेकदा आधीपासून चिरलेला सलाड देण्यात येतो. यात भरपूर मात्रेत जिवाणू आणि घाण असते. 

ग्रिल्‍ड फूड: ग्रिल्‍ड फूड अनहेल्‍दी असू शकतं कारण कित्येकदा ग्रिल प्रामाणिकपणे स्वच्छ केले जात नाही आणि कोसळाही जुनाच असतो, ज्यात सूक्ष्म जंतू पसरलेले असतात. 
फ्रूट ज्यूस: फलांचा रस हेल्थी असतो पण घरी तयार केलेला असला तर. बाजारातील फळ धुतलेली असतील याची खात्री करता येणार नाही. यात टाकली जाणारी बर्फही स्वच्छ पाण्याने तयार केलेली नसते.

संबंधित माहिती

ED ने झारखंडचे कॅबिनेट मंत्री आलमगीर आलम यांना अटक केली

माजी कर्णधार संदीप लामिछाने बलात्कार प्रकरणातून निर्दोष

सिंगापूरचे नवे पंतप्रधान म्हणून लॉरेन्स वोंग यांची निवड

Chess : आनंद-कार्लसन पुन्हा एकदा आमनेसामने या दिवशी होणार सामना

राहुल द्रविडचा कसोटी संघाचा मुख्य प्रशिक्षक होण्यास नकार!

पिठात बर्फाचे तुकडे टाका, पोळी बनवण्याची नवीन पद्धत जाणून घ्या

ही सामाजिक कौशल्ये शाळेत जाणाऱ्या मुलांना शिकवा

उन्हाळ्यात टरबूज किंवा खरबूज खाणे काय जास्त फायदेशीर आहे

हेअर डस्टिंग म्हणजे काय? त्याचे 4 सर्वोत्तम फायदे जाणून घ्या

Career Tips : 12वी पूर्ण केल्यावर या क्षेत्रात करिअर करा

पुढील लेख
Show comments