आपल्या पूर्ण दिवसभराचा थकवा तुम्ही जर एक ग्लास उसाचा रस पियून दूर करता तर थोडे सावध होऊन जा. तसं तर उसाचा रस एक गुणकारी पेय आहे. यात कॅल्शियम, पोटॅशियम, आयरन, मॅग्नेशियम आणि फॉस्फोरस सारखे बरेच आवश्यक पोषक तत्त्व असतात. तसेच उसाचा रस शरीरातील रक्त प्रवाहाला पण उत्तम ठेवतो.
तरी देखील यात असलेले एवढे गुण काही लोकांसाठी धोकादायक असतात. याचे सेवन त्यांच्यासाठी हानिकारक असू शकत.
जर तुम्ही कफ आणि खोकल्यामुळे त्रस्त असाल तर तुम्हाला उसाच्या रसाचे सेवन करणे टाळायला पाहिजे. असे केल्याने तुमच्या शरीरातील कफ समस्या अधिक वाढेल.
जर तुमच्या पोटात किडे असतील किंवा पोटाशी निगडित त्रास असेल तर तुमच्यासाठी उसाचा रस वर्जित आहे.
उसाचा रस शरीरातील शुगर लेवल वाढवतो. जर तुम्ही मुधमेहीचे रोगी असाल तर तुमच्यासाठी उसाचा रस विषाचे काम करतो.
जर तुमचे वजन जास्त असेल तरी देखील उसाचा रस नाही प्यायला पाहिजे. यात बर्याच मात्रेत कॅलोरिज आणि शुगर असते जे आमच्या शरीरासाठी नुकसानदायक आहे.