Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

कमी वेळात मेंदूला आराम देण्यासाठी उपाय

Stress Management
Webdunia
बुधवार, 2 डिसेंबर 2020 (10:09 IST)
सध्याच्या धावपळीच्या काळात माणसाचे मेंदू आणि मन कधी अडकेल कळतच नाही. मग ते कुटुंब असो, व्यवसाय असो किंवा समाजात राहून आपल्या समोर आलेल्या अडचणी असो. आपण बऱ्याच गोष्टीत आपले मन आणि मेंदू लावतो. जर आपले मन आणि मेंदू अस्वस्थ असेल तर आपण केलेल्या कामाच्या  परिणामाची कल्पना सहजच करता येऊ शकते. 

आपल्याला आपली कामे यशस्वी करण्यासाठी मेंदू आणि मन स्थिर आणि शांत असणे आवश्यक असते, कल्पना करा की आपले मेंदू शांत आणि स्थिर नसेल तर घेतलेले निर्णय कसे असणार? अर्थातच निर्णय चुकीचेच असणार. चुकीच्या निर्णयामुळे आपले आयुष्य अपयशी ठरत. त्यामुळे आपला आत्मविश्वास कोसळतो. मेंदूला ताण असल्यावर कॉर्टिसॉल नावाचे हार्मोन तयार होतात, जे आपल्या मेंदूसाठी हानिकारक असते. 
आपल्या मनाला आणि मेंदूला शांत करण्याचे काही मार्ग जाणून घेऊ या.
 
* हर्बल चहा प्यावा किंवा च्युईंगगम वापरा-
असे म्हणतात की ज्यावेळी एखादा व्यक्ती तणावात असतो तो चहा अधिक पितो. आपण बऱ्याच लोकांना बघितले असणार.

ऑफिसात कामाचे ताण वाढल्यास लोक चहा पितात, आपण दुधाचा चहा न पिता हर्बल चहा वापरावा. हर्बल चहा प्यायल्याने या मधील घटक आपल्या शरीरातील विषारी पदार्थांना दूर करतात आणि आपल्या मेंदूला आराम देतात. जर आपण चहा पीत नसाल तर आपण च्युईंगगम वापरा. या मुळे आपल्या कॉर्टिसॉल हार्मोनची पातळी कमी होणार. तथापि, हे जास्तकाळ चावू नये काही मिनिटानंतर काढून फेकून द्यावे आणि तोंडाला आराम द्यावा.
 
* स्ट्रेचिंग करणे आणि मालिश करणे - 
जर आपले मेंदू तणावात आहे, तर मालिश केल्याने आपल्याला त्वरितच आराम मिळू शकतो. अशा प्रकारे स्ट्रेचिंग देखील आपल्याला मदत करू शकेल.स्ट्रेचिंग आपण खुर्चीवर बसून किंवा पलंगावर बसून देखील करू शकता. या मुळे आपल्या स्नायूंना फार आराम मिळतो.
 
* योगा - 
आजच्या काळात योगा भारतातच नव्हे तर जगभरात शरीर आणि मनाला शांत ठेवण्यासाठी उपयुक्त ठरत आहे. सध्या तर बऱ्याच कंपन्या कॉर्पोरेट योगासाठी खास प्रशिक्षक देखील हायर करत आहे.
या साठी आपण सकाळ संध्याकाळचं योगा करावं असे आवश्यक नाही. आपणास मेंदूला त्वरितच आराम द्यायचे असल्यास योगा करायला पाहिजे. या मध्ये ध्यान, प्राणायाम इत्यादी पद्धतींचा समावेश करू शकता.
 
* उन्हात फिरणे - 
आपल्याला एखाद्या वातावरणाचे ताण येत असल्यास, तर पाच ते दहा मिनिटाचे वॉक घ्या. हे आपण एकटेच करावे, ते आपल्यासाठी योग्य असणार. ऊन देखील या साठी आपल्याला मदत करते आणि आपले मेंदू शांत ठेवते.

* ज्यूस पिणे किंवा डार्क चॉकलेट खाणे -
ज्यूस प्यायल्याने आपल्या मेंदूच्या लहरींना आराम मिळतो. विशेषतः आंबट फळांचे जसे की मोसंबी,संत्री,अननस या फळांचे सेवन करावे,या मुळे आपल्या मेंदूला त्वरितच आराम मिळतो. तसेच डार्क चॉकलेट खाल्ल्याने  तणाव असलेल्या मेंदूमध्ये कॉर्टिसॉलची पातळी कमी होते.
 
* आवडीचे संगीत -
आपल्या गाण्यांच्या अमर्यादित यादीं मधून आपल्यासाठी काही निवडक गाणी निवडा, ज्यांच्या मुळे आपल्याला चांगले वाटेल. तणावाच्या काळात काही निवांत क्षण आपल्याला शांती आणि आराम देतात. काही काळ डोळे मिटून गाणी ऐकल्याने आपले ताण दूर होतात. खरे सांगायचे तर आपल्या मेंदूनेच आपले शरीर आणि इतर व्यवहार नियंत्रित होतात, म्हणून आपल्या मनावर आणि मेंदूवर जास्त ताण देणे टाळावे आणि वरील उपाय करून मेंदूला आराम द्यावा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

Summer special Recipe पान कुल्फी

लॅपटॉपवर काम करून थकलेल्या डोळ्यांना द्या विश्रांती, या टिप्स जाणून घ्या

Career in fire engineering: फायर इंजिनिअरिंग अभ्यासक्रम मध्ये कॅरिअर

त्वचेचा रंग उजळण्यासाठी हे प्रभावी घरगुती उपाय

डाएटिंग शिवाय वजन कसे कमी करावे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments