Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

PCOD आणि पाळीच्या समस्या असणाऱ्या महिलांनी 'हा' आहार घ्या

Webdunia
शनिवार, 29 जुलै 2023 (09:27 IST)
PCOD चा शब्दशः अर्थ पॉलीसिस्टिक ओव्हेरियन डिसीज असा आहे. हा एक प्रकारचा हार्मोन संबंधी आजार आहे. हा आजार आजकालच्या मुलींमध्ये सामान्यपणे आढळतो.
 
यामध्ये ओव्हरीमध्ये एका अंड्याच्या जागी अनेत लहानलहान अंडी तयार होऊ लागतात. पण त्यातील एकही योग्य नसते. यामुळे महिलांची मासिक पाळीचे चक्रही बिघडते.
 
PCOD झाल्यास स्त्रियांमध्ये अनियमित मासिकपाळी, थकवा येणे, वजन वाढणे, चेहऱ्यावर पिंपल्स येणं किंवा शरीरावर असामान्य केसांची वाढ होणे, केस गळणे हि लक्षणे दिसून येतात
 
म्हणून आपल्या आहारात सुधारणा करणे हा या रोगाच्या उपचाराचा सर्वात महत्वाचा भाग आहे.
 
PCOD असेल तर काय खावे आणि काय खाऊ नये?
PCOD हा इन्सुलिन आणि एन्ड्रोजनच्या वाढलेल्या पातळीमुळे होत असल्याने, आहारात या हार्मोन्सचं उत्पादन कमी करणाऱ्या गोष्टींचा समावेश असावा. अशा गोष्टीदेखील खाल्ल्या पाहिजेत ज्यामुळे प्रोजेस्टेरॉन आणि एस्ट्रोजेन हार्मोन्सचे उत्पादन वाढू शकतं.
 
प्रत्येक व्यक्तीने तंतुमय पदार्थ खाल्ले पाहिजेत. तंतुमय पदार्थाने युक्त असलेलं अन्न इन्सुलिन नियंत्रित करण्यात मदत करतं, म्हणून तंतुमय पदार्थयुक्त अन्न खा.
 
तंतुमय पदार्थामध्ये मुख्यत्वे भाज्या, फळे आणि मोड आलेल्या कडधान्यांचा समावेश असतो.
 
तृणधान्य, चणे, राजमा, हिरवे मटार, अंबाडी, अंजिर, पालक, पेर, पेरू, खोबरे यांच्यामधून भरपूर फायबर मिळतात. गाजर, सफरचंद, मका, मक्याच्या लाह्या, सालीसह उकडलेले बटाटे, बदाम, स्ट्रॉबेरी, संत्री यामध्येही भरपूर प्रमाणात फायबर असतात.
 
कमी फॅट असलेलया प्रथिनांचा आहारात समावेश करा
 
प्रथिनयुक्त आहार शरीरातील एंड्रोजेन आणि टेस्टोस्टेरॉनची वाढलेली पातळी कमी करण्यात मदत होते, त्याचप्रमाणे वाढलेल वजन नियंत्रणात आणायला पण प्रथिनयुक्त आहाराची मदत होते.
 
डाळी, कडधान्य, मासे, चिकन, अंडी इत्यादी. तसेच शरीरातील वाढलेल साखरेचं प्रमाण असतं ते सुद्धा नियंत्रित ठेवायला प्रथिनं मदत करतात.
 
हिरव्या पालेभाज्या जरूर खा.
 
पालक, मेथी, माठ,राजगिरा यांसारख्या हिरव्या पालेभाज्यांमध्ये फायबर , लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हीटॅमिन बी आणि कॅल्शियमचे प्रमाण जास्त असते.
 
हिरव्या पालेभाज्यांमधे सर्व महत्त्वाचे पोषक घटक असल्यानं शरीराची वाढ तसेच चांगल्या आरोग्यासाठी त्या महत्वाच्या असतात. व्हिटॅमिन बी हा आठ वेगवेगळ्या व्हिटॅमिन्सचा समूह आहे.
 
या आठ जीवनसत्वांमध्ये थियामिन, रिबोफ्लेविन, नियासिन, पँटोथेनिक अॅसिड, बायोटिन, फोलेट, कोबालमिन यांचा समावेश असतो.
 
थकवा कमी करण्यासाठी काय खावं?
हिरव्या पालेभाज्यांमध्ये लोह असतं, त्यांचा आहारात समावेश केला जाऊ शकतो.
 
लाल मांसातही लोह असतं. सी जीवनसत्त्व असणाऱ्या लिंबासारख्या फळांचा आहारात समावेश हवा.
 
शरीराला पुरेशा प्रमाणात पाणी मिळायला हवं. आहारात फळं आणि भाज्यांचा समावेश वाढवावा कारण त्यांच्यात पुरेशी जीवनसत्त्वं असतात.
 
प्रक्रिया केलेलं अन्न टाळावं, साखरेचं अतिसेवन करू नये आणि दिवसभरात सतत खाण्यापेक्षा पोट भरून तीनदा व्यवस्थित जेवण करून सतत अध्येमध्ये खाणं टाळावं.
 
साखरेचे पदार्थ टाळा
क्तातील साखर वाढल्याने लठ्ठपणा वाढतो, तर ते टाळण्यासाठी बेकरी पदार्थ, चॉकलेट्स, फळांचे रस किंवा कुठलेही गोड पदार्थ खाणं पूर्ण बंद करा.
 
या सगळ्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं आणि त्याचा इंसुलिनच्या पातळीवर नकारात्मक परिणाम होतो.
 
कार्बोहायड्रेटसयुक्त आहार कमी करा
कार्बोहायड्रेटमध्ये फायबर नसतं आणि ते इन्सुलिनची पातळी वाढवतात. जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेटस् खाल्ल्याने वजन वाढू शकतं. प्रक्रिया केलेल्या कार्बोहायड्रेट स्त्रोतांमध्ये केक, पेस्ट्री आणि पांढरा ब्रेड यांचा समावेश होतो.तसेच पांढरे तांदूळ आणि बटाट्यासारख्या गोष्टींमध्ये हाय ग्लायसेमिक इंडेक्स असतो. त्यामुळे या गोष्टी आहारातून कमी करा
 
तळलेले पदार्थ खरे तर जास्त प्रमाणात मीठ आणि ट्रान्स फॅट्स युक्त आहेत आणि ते PCOD साठी चांगले नाहीत, त्याचप्रमाणे या तळलेल्या पदार्थात कॅलरीज हि जास्त असतात, ज्यामुळे वजन वाढू शकतं. ते टाळण्यासाठी तळलेले पदार्थ टाळलेलेच बरे.
 
अशाप्रकारे सकस आहार, योगासने किंवा व्यायाम आणि निरोगी जीवनशैलीचा अवलंब करून PCOD बरा होऊ शकतो.
 
प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट चालतेच असं नाही. त्यांच्या आजारानुसार, आजाराच्या तीव्रतेनुसार त्यांच्या आहारात बदल करावे लागतात. त्यामुळे आहारतज्ज्ञ व स्त्रीरोगतज्ज्ञ यांचा सल्ला जरूर घ्या.
 


Published By- Priya Dixit 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

रवींद्र जडेजानेही आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती घेतली

प्रेयसीचा बलात्कार करून खून करणाऱ्या आरोपीची पोलीस ठाण्याच्या शौचालयात आत्महत्या

अर्जुनाच्या लक्षाप्रमाणे आमचे लक्ष पण महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकडे आहे, शरद पवारांचे वक्तव्य

देवेंद्र फडणवीस यांनी टीम इंडियाला वर्ल्ड चॅम्पियन बनवल्याबद्दल केले अभिनंदन, म्हणाले-

शिंदे सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू केली 'तीर्थ यात्रा योजना

सर्व पहा

नवीन

तुमच्या नाभीत घाण कशी आणि कुठून तयार होते, माहित आहे का?

हे 3 जपानी रहस्य तुम्हाला लठ्ठपणापासून नेहमी दूर ठेवतील, तुमचे शरीर राहील तरुण

Tandoori Roti Recipe : या पद्धतीने बनवा फुगलेली तंदुरी रोटी

घरात मुंग्याचा त्रास असल्यास हे 3 घरगुती उपाय करा

कंबरदुखीने हैराण असल्यास अंघोळीच्या पद्धतीत करा हे बदल, जाणून घ्या 5 टिप्स

पुढील लेख
Show comments