Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Ear Infection In Rainy Season : पावसाळ्यात कानाच्या आजारापासून कसं वाचावं जाणून घ्या

Webdunia
बुधवार, 15 जुलै 2020 (12:00 IST)
कानात संसर्ग तर कोणत्याही हंगाम्यात होऊ शकतं, पण पावसाळा इतर हंगामापेक्षा जास्त संसर्ग करणारा असतो. अश्या परिस्थितीत आपल्यासाठी काही महत्वाच्या टिप्स सांगत आहोत, जे आपल्याला कानाच्या आजार आणि संसर्गापासून वाचण्यात मदत करेल.
कानाचे आजार : 
पावसाळ्यात संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असते. संसर्गामुळे पावसाळ्यात कानाचे आजार पसरतात, जे आपल्यासाठी समस्या उभारतात. चला तपशीलवार जाणून घेउया ...

माणसाच्या कानात महत्वपूर्ण ज्ञानेंद्रिय असतात जे प्रामुख्याने दोन प्रकारे कार्य करतात.
1 ऐकणे किंवा शब्द ऐकणे 2 शरीरास संतुलित करणे.
शरीराच्या रचनांच्या दृष्टीने कानाचे 3 भाग आहे. 
1 बाह्य कान, 2 मध्य कान, 3 अंत:कान. 
अंत: म्हणजे आतील कानात काही विकार आल्यास प्रामुख्याने चक्कर येणे, चालायला त्रास होणं किंवा उलट्या होणं किंवा मळमळणं आणि कानात वेगवेगळ्या आवाज येणं सारखे लक्षणे उद्भवतात.

कानाचे प्रत्येक अवयव व्यवस्थितरीत्या काम केल्याने माणूस ऐकू शकतो. या अवयवांमध्ये कानाच्या पडद्यापासून मध्य कान आणि अंत:कानाच्या अवयवांमध्ये विकार आल्यावर वेगवेगळ्या प्रकाराची श्रवणहीनता होते. 

साधारपणे कानातून पस आल्याचे कोणी गाम्भीर्यपणाने घेत नाही. असे करू नये. ह्याचे गांभीर्य जाणून योग्य आणि तज्ञ चिकित्सकांच्या सल्ला घ्यावा नाही तर कधी कधी मेंदू ज्वर आणि मेंदूच्या एका विशिष्ट प्रकाराच्या कर्करोगासारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.

कानात पस कोणत्याही वयात येऊ शकतं. पण बहुधा हे एका वर्षापेक्षा जास्त लहान बाळ किंवा अश्या मुलांना होऊ शकतं जे जास्त काळ आपल्या आईच्या कुशीतच बसतात. म्हणजे जे बसू शकत नाही, कूस बदलता येत नसे, म्हणजे अगदी तान्हे बाळ असतात. कानातून पस येणाचे उगम स्थान मध्य कानाचे संसर्ग आहेत.

मध्य कानात सूज येऊन पिकून पडदा फाटून पस येऊ लागतो. मध्य कानात संसर्ग होण्याचे तीन मार्ग आहेत, ज्यामध्ये 80 -90 टक्के कारणीभूत घसा आणि कान जोडणारी नळी आहे. या मुळे नाक, कान आणि घश्याच्या साधारण सर्दी पडसं, टॉन्सिलायटिस, खोकला या कारणांमुळे मध्य कानात संसर्ग होतो.
 
लहानग्या बाळांच्या गळ्या ते कानाला जोडणारी नळी लहान किंवा रुंद असल्याने, दूध पाजणाऱ्या मातांना नेहमी बाळाला मांडीवर घेउन दूध पाजताना बाळांच्या डोक्याखाली हात लावायला पाहिजे. अश्या माता जे आपल्या बाळाला झोपून दूध पाजतात, त्यांच्या बाळाच्या कानात पस होण्याचा त्रास उद्भवण्याची दाट शक्यता असते.
 
आयुर्वेदाच्या दृष्टीकोणातून सर्दी पडसं झाल्यास तर खालील उपाय करावे. मोहरीचे तेल गरम करून पोट, पाठ, छाती चेहरा, डोक्याला लावून सकाळ संध्याकाळ मॉलिश करावी.

जगभरात कोट्यवधी लोकं असे सापडतात जे बहिरे आहे. कमी ऐकू येणे किंवा अजिबातच ऐकायला येत नसणे याला बहिरेपणा म्हटलं जातं. ह्याची सुरुवात अगदी हळुवारपणाने होते नंतर त्रास वाढू लागतो. आपणास एखाद्या माणसाच्या जोरात बोलणं ऐकण्यासाठी फार धडपड करावी लागत असल्यास, आपल्याला ऐकण्याचा त्रास उद्भवू शकतो. 
 
सल्ला आपल्यासाठी -
* जर आपल्याला ऐकू येणं कमी झाले असल्यास किंवा कानात काही संसर्ग झाले असल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
* मोठ्या आवाजात सतत इयरफोनने संगीत ऐकू नये.
* घरातच कान स्वच्छ करण्याचा प्रयत्न करू नये. हे एखाद्या विशेषज्ञ कडूनच करवून घ्यावं.
* कानात हेयरक्लिप, सेफ्टीपिन, काडेपेटी किंवा तीक्ष्ण वस्तू घालणे टाळा, अश्याने आपला कानाचा पडदा देखील फाटू शकतो.
* चिकित्सकांच्या सल्ला घेतल्याशिवाय वेदनाशामक, किंवा अँटिबायोटिक्स औषधांचे सेवन करू नये.
* प्रेशर हार्न वापरू नये.
* जोराचा आवाज टाळणे शक्य नसल्यास कानात कापूस घाला.
* कमी ऐकू येत असल्यास ऑडीयोमेट्री तपासणी करा.
* वाहनं चालविताना मोबाईल वापरू नये.
* रात्री शक्यतो इयरफोनचा वापर टाळा.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Gajanan Maharaj Prakatdin 2025 गजानन महाराज यांच्याबद्दल संपूर्ण माहिती

श्री गजानन महाराज बावन्नी

Mandir Vastu : या वस्तू देवघरात ठेवल्याने भांडण होतात

छत्रपती शिवाजी महाराजांनी ८ वेळा लग्न का केले? त्यांच्या पत्नींशी संबंधित या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

बेरी स्वच्छ करण्यासाठी या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

छत्रपती शिवाजी महाराज जयंती मराठी भाषण Shiv Jayanti Speech

Shiv Jayanti Wishes 2025 छत्रपती शिवाजी महाराज जयंती शुभेच्छा संदेश

मसाला मॅकरोनी रेसिपी

Breakfast recipe : रवा आप्पे

Career in PG Diploma in Operations Management : पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन ऑपरेशन्स मॅनेजमेंट

पुढील लेख