Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Home Remedies for leg pain :पाय दुखत असतील तर हे घरगुती उपाय करा

Webdunia
शुक्रवार, 4 नोव्हेंबर 2022 (16:53 IST)
आजच्या काळात, जास्त वेळ चालण्यामुळे किंवा जास्त वेळ उभे राहिल्याने, लोकांना त्यांच्या पायांमध्ये आणि पायाच्या स्नायूंमध्ये वेदना होऊ लागतात. पायदुखीचा त्रास रात्रीच्या वेळी होतो, त्यामुळे रात्री झोपणे कठीण होते. या समस्येचे वेळीच निदान झाले नाही तर या समस्येमुळे पुढे गंभीर समस्या उद्भवू शकतात. काही लोक वेदनाशामक औषधे घेण्यास सुरुवात करतात जी त्यांच्या आरोग्यासाठी चांगली नसते.काही घरगुती उपाय अवलंबवून पायाची वेदनापासून मुक्तता मिळेल. चला तर मग जाणून घेऊ या.
 
पाय दुखण्यावरकाही घरगुती उपाय-
 
सफरचंद व्हिनेगर-
ऍपल सायडर व्हिनेगर पाय आणि पायाच्या स्नायूंमध्ये वेदना कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे. दोन चमचे व्हिनेगरमध्ये मध मिसळून ते रिकाम्या पोटी घ्या, असे केल्याने तुम्हाला दुखण्यात आराम मिळेल. तसेच, आपण ते थेट वेदनाग्रस्त भागावर लावू शकता. सफरचंद व्हिनेगरचे काही थेंब टाकून तुम्ही टबमध्ये पाय बुडवूनही बसू शकता.असं केल्याने पायाच्या दुखण्यापासून आराम मिळेल.
 
मोहरीचे तेल -
पायदुखीमध्ये तुम्ही मोहरीच्या तेलाची मालिश करू शकता, ज्यामुळे तुम्हाला खूप फायदे होतील. पायांच्या दुखण्यापासून लवकरच सुटका मिळेल. ही घरगुती रेसिपी सर्वात जास्त वापरली जाते. 
 
गरम पाणी-
पायांचे स्नायू आणि पाय दुखण्यात गरम पाणी खूप उपयुक्त आहे. तुम्ही कोमट पाण्यात मीठ टाका आणि पाय बुडवून बसा. ही प्रक्रिया केल्याने तुम्हाला वेदनांमध्ये खूप आराम मिळेल.हे  एक उत्तम नैसर्गिक उपाय आहे.
 
मेथीदाण्याचा वापर-
वेदना कमी करण्यासाठीही मेथी गुणकारी आहे. एक चमचा मेथीदाणे रात्रभर भिजत ठेवा आणि सकाळी खा. असे केल्याने तुम्हाला पायाचे स्नायू आणि पाय दुखण्यात खूप आराम मिळेल.
 
हळद
हळदीमध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाहक-विरोधी गुणधर्म असतात जे तुमच्या पायाचे स्नायू आणि पाय दुखणे दूर करण्यास मदत करतात. कोमट दुधात हळद मिसळून प्यायल्यानेही दुखण्यात आराम मिळतो, यासोबतच पायांना हळदीची पेस्टही लावू शकता.
 
Edited by - Priya Dixit 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Breast Size स्तनांचा आकार वाढवण्यासाठी दररोज करा हे योगासन, आकर्षण वाढेल

२९ मार्च रोजी शनि कुंभ राशीत अस्त करणार, ३ राशींना अडचणींना सामोरे जावे लागेल!

Surya Grahan 2025 वर्षातील पहिले सूर्यग्रहण भारतात दिसेल का? सुतक काळ आणि त्याचा परिणाम जाणून घ्या

उन्हाळ्यात भाजी खरेदी करताना या गोष्टी ठेवा लक्षात

घराच्या दिशेनुसार कोणती झाडे लावावीत

सर्व पहा

नवीन

Ice for Weight Loss वजन कमी करण्यासाठी आइस हॅक, जाणून घ्या काय आहे हा प्रकार

व्यायाम करताना पाणी का प्यावे? त्याचे फायदे जाणून घ्या

24 मार्च 2025 च्या जागतिक क्षयरोग दिनाची थीम, लक्षणे काय आहे, जाणून घ्या

टॅलीमध्ये करिअर करा

आजीच्या काळातील जादुई केसांच्या तेलाची रेसिपी जाणून घ्या

पुढील लेख
Show comments