Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Home remedies for Weakness : थकवा आणि अशक्तपणा दूर करण्यासाठी हे घरगुती उपाय अवलंबवा

Webdunia
गुरूवार, 5 जानेवारी 2023 (19:47 IST)
Home remedies for Weakness :आजच्या काळात माणसाचे जीवन इतके व्यस्त झाले आहे की स्वत:साठी थोडा वेळ काढणेही कठीण झाले आहे. त्यामुळे विविध समस्या निर्माण होत आहेत. सकाळी लवकर उठण्यापासून ते रात्री उशिरापर्यंत झोपेपर्यंत आरामात बसणे कठीण झाले आहे, त्यामुळे ना शारीरिक आराम मिळतो ना मानसिक आराम. जेव्हा माणूस दिवसभराच्या कामानंतर घरी येतो तेव्हा त्याला खूप थकवा जाणवतो. सततच्या थकव्यामुळे शरीर अशक्त होऊ लागते. आणि मग त्या व्यक्तीची चिडचिड होते, परंतु काही छोट्या गोष्टींची काळजी घेऊन तुम्ही या व्यस्त वेळापत्रकात स्वतःला सक्रिय आणि निरोगी ठेवू शकता.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1. जास्त पाणी प्या
अनेकदा लोक जास्त पाणी पिण्यास आळस करतात. कारण, जास्त पाणी प्यायल्याने वारंवार वॉशरूमला जावे लागते. पण पाणी जास्त प्यायल्याने ते तुमच्या शरीरातील टॉक्सिन्स देखील काढून टाकते. पण हे टाळण्यासाठी लोक कमीत कमी पाणी पितात. असे करणे शरीरासाठी खूप हानिकारक आहे. तुम्ही ऑफिसमध्ये असाल किंवा घरी असाल तरीही ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, पुरेसे पाणी प्यायल्याने  शरीर निरोगी आणि सक्रिय राहते.
 
2. निरोगी अन्न खा
आपल्या शरीराला निरोगी राहण्यासाठी निरोगी अन्नाची गरज असते. पण पौष्टिक अन्न खाण्याऐवजी आपण बाजारात मिळणार्‍या विरुद्ध खाद्यपदार्थाला प्राधान्य देतो. त्यामुळे आपल्या शरीरात थकवा आणि कमजोरी वाढते. दुसरीकडे, जर तुम्ही निरोगी अन्न, हिरव्या पालेभाज्या आणि प्रथिनेयुक्त अन्न खाल्ले तर तुम्ही निरोगी राहाल.
 
3 नियमित व्यायाम करा -
 दिवसभर अॅक्टिव्ह राहायचे असेल तर नियमित व्यायाम करणे खूप गरजेचे आहे. दररोज एक तास व्यायाम केल्याने दिवसभरात थकवा दूर होईल आणि निरोगी राहाल.
 
अशक्तपणा आणि थकवा कसा दूर करावा ?
पोषण, तंदुरुस्ती आणि एकूणच आरोग्याची काळजी घेणे आवश्यक आहे.
* सोपे व्यायाम करा. हळू चालणे, श्वास घेण्याचे व्यायाम आणि ध्यान करून प्रारंभ करा.
* आपल्या शरीराला विश्रांतीची आवश्यकता आहे. कठोर वर्कआउट्स करणे टाळा.
* दररोज सकाळी 30 मिनिटे सूर्यप्रकाश घ्या. 
* एक खारीक,बेदाणे,दोन बदाम, रात्रभर पाण्यात भिजत ठेवलेले दोन अक्रोड, सकाळी खावे.
* हलकं आणि सुपाच्य अन्न खावे.
* जास्त साखर,तळकट किंवा प्रक्रिया केलेले अन्न वापरणे टाळा.
*  पौष्टिक खिचडी एक दिवसाआड खावी.
* आठवड्यातून 2-3 वेळा भाज्यांचे सूप प्यावं. 
* जिरे-बडी शोपचा चहा दिवसातून दोन वेळा म्हणजे जेवणानंतर एका तासाने प्यावा. 
* रात्री लवकर झोपावे
* सकाळी लवकर उठणे, सकाळचा वेळी वॉक ला जा.
* दररोज व्यायाम करा,  शारीरिक आणि मानसिक दृष्टया हे आपणास लवचिक बनवते.  
*प्राणायाम जसे की अनुलोम-विलोम भ्रामरी,कपालभांति,भ्रस्त्रिका दररोज केले जाऊ शकते.
* आपण घरी हर्बल चहा देखील पिऊ शकता. हे आपल्या प्रतिकारक शक्तीला सुधारण्यास मदत करते. 
* गॅझेटचा वापर मर्यादित करा. 
* पुरेशी झोप घ्या.
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

पंचतंत्र : एकतेचे बळ कहाणी

चटपटीत शिंगाड्याचे लोणचे रेसिपी

Amla During Periods मासिक पाळी दरम्यान आवळा खाऊ शकतो का? Amla पीरियड्सवर परिणाम करतो का?

पौष्टिक मेथीचे कटलेट रेसिपी

पीएचडी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये करिअर करा

पुढील लेख
Show comments