Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

घशात खवखव असल्यास हे 6 उपाय अवलंबवा

घशात खवखव असल्यास हे 6 उपाय अवलंबवा
, सोमवार, 24 मे 2021 (18:29 IST)
घशात खवखव असल्यास कोणत्याही कामात मन लागत नाही. वारंवार खवखव आल्यावर आजूबाजूचे लोक देखील अस्वस्थ होतात. खवखव वाढल्यावर एलोपॅथिक औषधे घेण्याचा विचार करतो.परंतु आपल्या घरात अशा अनेक गोष्टी आहे. ज्यांचा वापर करून आपण सहजपणे घशाची खवखव पासून मुक्तता मिळवू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या. 
 
1 मिठाच्या पाण्याचे गुळणे- आपल्याला काही काही दिवसांनी कफेचा त्रास होत असल्यास पाण्यात मीठ घालून ते पाणी गरम करा आणि दिवसातून किमान 3 वेळा मिठाच्या पाण्याचे गुळणे करा. 2 दिवसातच फरक जाणवेल. त्याचे कोणतेही दुष्परिणामही नाहीत. आपण हे दररोज देखील करू शकता. कफ नाहीसा झाल्यावर  आवाजही उघडतो आणि स्पष्ट होतो.
मिठाच्या पाण्याचे गुळणे केल्याने घशाची सूज आणि वेदनेमध्ये देखील आराम मिळतो असं संशोधनात आढळून आले आहे. डॉक्टर देखील मिठाच्या पाण्याचे गुळणे करण्याचा सल्ला देतात. 
 
2 टाकणखार किंवा सुहागी-हे स्वयंपाकघरात सहजपणे आढळतं. हे रात्री दुधासह घेतले जाते या मुळे एका दिवसातच आराम होतो. हे पांढऱ्या रंगाचे असते . लोखंडी तव्यावर याला मंद आचेवर गरम केले जाते. गरम झाल्यावर ती फुगते तेव्हा गॅस बंद करून ठेऊन द्यावा. नंतर ती भुकटी दुधासह घ्यावी. ही घेतल्यावर काहीही खाऊ-पिऊ नका.सकाळी उठल्यावर आपल्याला नक्कीच आराम मिळेल. 
 
3 मध आणि काळीमिरी -प्रत्येक वेदनाशामक औषध स्वयंपाकघरात आढळतं.झोपण्याच्या पूर्वी एक चमचा मध घ्या आणि त्यात काळी मिरी मिसळा. एक चमचा पूर्ण खा. यानंतर, काहीही खाऊ-पिऊ नका . दुसर्‍या दिवशी सकाळी आराम मिळेल.
 
4 आलं - आल्यात अँटी बेक्टेरिअल घटक आढळतात. एक कप पाण्यात आलं घालून उकळवून घ्या. हे कोमट झाल्यावर त्यात मध मिसळा आणि दिवसातून 2 वेळा प्यावे. याचा सेवनाने घशातील कफ नाहीसा होतो आणि वेदना देखील कमी होतील. 
 
5 मसाला चहा- मसाला चहा प्यायल्याने देखील आराम मिळतो. या चहा मध्ये लवंग,तुळस,आलं,काळीमिरी,घालून उकळवून घ्या. या नंतर पाण्यात चहापत्ती आणि साखर घाला उकळवून गाळून पिऊन घ्या.याचा सेवन केल्याने कफात आराम मिळेल. घशात वेदना देखील कमी होईल. 
 
6 अमृत धारा- हे भीमसेनी कापूर,आसमंतारा,आणि ओव्याच्या अर्कांपासून बनविली जाते. खवखव असल्यास घशावर हे लावावे आणि थेंबभर त्याचे सेवन केल्याने आश्चर्यकारक फायदे करते. 
 
टीप: वरील दिलेली माहिती सामान्य घसा दुखणे आणि कफसाठी अत्यंत प्रभावी आहे. परंतु कोरोना कालावधीत, उपरोक्त उपचारातून आराम न मिळाल्यास त्वरित डॉक्टरांशी चर्चा करा.
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Yellow Fungus काय आहे? 'पिवळ्या बुरशी' चे लक्षणं, बचाव आणि खबरदारी