Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

भन्नाट पुणेरी विनोद

Webdunia
शुक्रवार, 13 जानेवारी 2023 (19:55 IST)
1 एक बाळ जन्माला आल्या-आल्या बोलायला लागतो.
तो नर्सला विचारतो, खायला काय आहे?
नर्स : पोहे आणि उपीट तयार आहे...
मुलगा: अरे देवा! परत पुण्यातच जन्माला आलो....!!
 
 
2 एक पुणेरी मुलगा आपल्या मित्रांना घरी घेऊन आला 
आणि म्हणाला, " थांबा मी चहा घेऊन आलो..."
१० मिनीटांनी, " चला माझा चहा घेऊन झाला 
आपण आता जाऊया!
 
 
3 स्थळ अर्थातच  सदाशिव पेठ, पुणे.
जोशीकाका : काय तात्या, आज अगदी आनंदात दिसता आहात ! काय झालं ?
तात्या : अहो, आमच्या शेजारच्या मानेंना १ लाख रुपयाची लॉटरी लागलीये!
जोशीकाका : मग तुम्हाला का इतका आनंद झालाये ?
तात्या : त्याला आता तिकिट सापडत नाहीये !
 
 
4 स्थळ: पुणे 
पेशंट:- डॉक्टर,प्लास्टिक सर्जरी करायची आहे, 
साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये.
पेशंट (थोडा विचार करून):- आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर?
 
5 स्थळ : पुणे 
एक मुलगा सायकलवरुन जाताना, एका मुलीला धडकला....!! 
मुलगी: बावळट.. ब्रेक नाही का मारता येत...? 
मुलाचे पुणेरी उत्तर: अख्की सायकल मारली, 
आता काय ब्रेक वेगळा काढून मारु..!!!.
पुणेरी एकदम तिखट....

6 बाळूः काकू, चिंटू आहे का घरी?
जोशी काकूः  आहे ना, गरमा-गरम पोहे खातोय.
तुलापण भूक लागली असेल ना?
बाळूः हो 
जोशी काकूः मग घरी जा आणि काहीतरी खाऊन ये...
 
7 बायको: अहो काल डॉक्टर मला सांगत होते की,
माझा 'बीपी' वाढलाय! पण बीपी म्हणजे काय हो सांगा ना?
नवराः अगं 'बीपी' म्हणजे 'बावळट पणा'
खळखळुन हसा निरोगी रहा,
मित्रांनो आपणही हसा, आणि दुसऱ्यांनाही हसवा
          
 
HAPPY WORLD'S LAUGHTER (HAASYA) DAY 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Look Back Entertainment 2024: गुगलवर जगभरात सर्वाधिक सर्च केली जाणारी सेलिब्रिटी बनली हिना खान

सलमान खान साऊथमध्ये खळबळ उडवणार,या सुपरस्टारच्या चित्रपटात दिसणार

हैदराबाद येथील घरातून अभिनेता अल्लू अर्जुनला पोलिसांनी केली अटक

रणबीर कपूरने 'ब्रह्मास्त्र' आणि 'ॲनिमल'च्या सिक्वेलचे अपडेट दिले

लग्नानंतर स्त्रियांचं आयुष्य संपत नाही तर...; कथानक ऐकताच मालिकेसाठी होकार दिला

सर्व पहा

नवीन

बेटे को हाथ लगाने से पहले बाप से बात कर… शाहरुख खानच्या डायलॉगवर समीर वानखेडेची प्रतिक्रिया

विक्रांतचे निवृत्तीनंतर पुन्हा स्पष्टीकरण

Travel :हिवाळ्याच्या हंगामात भारतात या ठिकाणी भेट द्या

टिटवाळा येथील महागणपती

यशराज फिल्म्स आणि पोशम पा पिक्चर्सच्या पहिल्या मोठ्या चित्रपटात आयुष्मान खुराना मुख्य भूमिकेत, समीर सक्सेना करणार दिग्दर्शन!

पुढील लेख
Show comments