Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

विविध राशींच्या बायका फराळाला घरी बोलावल्यावर कसे स्वागत करतात ते बघा

Webdunia
मेष
समोर डिश ठेवून घ्या. ...एवढेच म्हणणार....आग्रह वगैरे नाहीच. गप्प बसून राहणार....
येणार्‍याला कुठून आलो असे होते.
 
वृषभ
वृषभ
यांची तर्‍हाच वेगळी....डिश पुढे ठेवून 
इतका आग्रह करतील .....की  पाहुण्याची वृश्चिकेची फटकळ पत्नी म्हणते....."अहो खातो आम्ही आमच्या हाताने भरवू नका."
 
मिथुन
कुठल्याच बाबतीत सिरियसनेस नाही. "अय्या खरंच आलात की तुम्ही", आता आमची चकली खाऊनच जा. तुटली तर तुम्ही जिंकलात."ह्याह्याह्या....
 
कर्क
कायम धास्तावलेल्या
बरं का!! या वेळेस मोतीचूर लाडू घरी बनवलेले नाहीत. समोरच्या दुकानातून आणलेत. तूप चांगलं वापरत नाही म्हणे....पण आम्ही खाल्ले"....घ्या ना....
 
सिंह
मला अनारसे बनवता येत नाहीत. ते मागू नका....आणि मुलाला बोलावले नसताना घेऊन आलाय. सांभाळा त्याला.....
 
कन्या
इतका वेळ डिश पुसत बसणार की मेषेचा पाहुणा स्वतःच्या खिशातल्या रुमालाने डिश पुसून फराळ वाढून घेतो.
 
तूळ
ताजं द्यायला हवं हे इतकं डोक्यात बसलेलं असत की पाहुणे आल्यावर लाडू वळायला घेतात.
 
वुश्चिक
मुलूखमैदान तोफ
पाहुण्यांसमोरच नवर्‍याला ओरडणार.. 
"सक्काळपासून 5 बेसन लाडू हादडून झालेत. आता यांच्याबरोबर अजून एक कसला घेताय?"
 
धनू
मला नेहमी काहीतरी हटके आवडतं म्हणून रूटीन फराळाचं न देता मस्त फोडणीची पोळी देते. "
बिचारा कर्केचा पाहुणा निमूटपणे ते अन्नब्रह्म गिळतो.
 
मकर
आता महागाई इतकी झालीय....त्यात यांना बोनस ही नाही मिळाला. उगा तुम्हाला बोलावलेय म्हणून केलं सगळे "
पाहुणा बघत राहतो.
 
कुंभ
दिवाळी दरवर्षीच येते पण आयुष्याचा भरवसा नाही. पुढच्या वर्षी तुम्ही असाल नसाल म्हणून आत्ता बोलावलेय."
 
मीन
अहो तुम्हाला बोलावलेय हे विसरले...."ए चिंटू समोरच्या मिठाईवाल्याकडून  आण सगळे पाव पाव किलो हे काही जास्त खात नाहीत"

संबंधित माहिती

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

प्रसिद्ध अभिनेत्याने पत्नीच्या आठवणीत केली आत्महत्या, अपघातात झाला होता पत्नीचा मृत्यू

Gurucharan Singh: तारक मेहताचा 'रोशन सोढी 25 दिवसांनी घरी परतले

भूमी पेडणेकरने फॅशनला बनवला तिचा आत्मविश्वास, म्हणाली-

Shani Shingnapur शनी शिंगणापूर 10 चमत्कार, काय आहेत मंदिराचे नियम

मुंबई होर्डिंग दुर्घटनेत अभिनेता कार्तिक आर्यनच्या मामा-मामी चा मृत्यू, 55 तासांनंतर मृतदेह बाहेर काढले

पुढील लेख
Show comments