Dharma Sangrah

सदाशिव पेठी पुणेरी बायको आणि बिच्चारा नवरा

Webdunia
सोमवार, 11 जानेवारी 2021 (12:19 IST)
बायको तणतणत पेपर वाचत असलेल्या नवऱ्याला ओरडते: "काय हो, गव्हाचे पीठ कुठून दळून आणलंत तुम्ही ?"
.
.
.
नेहमीच्या पद्धतीने नवऱ्याला बायको काय बोलतीये ते कळायला वेळ लागतोच. 
थोड्या वेळाने उत्तर येते: "रोजच्याच गिरणीतून. भावे आहेत ना, गरवारे कॉलेजसमोर, त्यांच्याकडून !!!"
.
.
.
बायको: "भैय्याकडे गहू देऊन फिरायला गेले असणार ? बाजूला पानाच्या दुकानात सिगारेटी फुंकून आला असणार !!! किंवा पुढे जाऊन सह्याद्रीच्या बाजूला चंदूकडचे कांदे पोहे हादडले असणार नक्की !!!"
.
.
.
बावचळलेला नवरा : "कुठेच गेलो नव्हतो. तिथेच तर पूर्णवेळ उभा होतो."
.
.
.
बायको : "लक्ष कुठे होतं मग तुमचं ? दुसऱ्या बायकांकडे बघत बसले असाल, समोरच गरवारे कॉलेज आहे, सगळ्या छबकड्या येतात कर्वे रस्त्यावर मरायला ....... आणि मला काही कळत नाही असे समजू नका !!! २७ वर्षे मी म्हणून तुमच्यासारख्या खविसा बरोबर संसार केलाय !!! दुसरी असती तर सोडून गेली असती केव्हाच !!! माझे नशीबच मेले फुटके !!! तरी आईने फडक्यांच्या त्या दिनूला विरोध केला नसता, तर आज कुठल्या कुठे असते मी, आत्ताच दिनू लंडनहून परत येऊन कॅलिफोर्निया ला गेला आहे, अजून लग्नही केले नाही बिच्च्च्चाऱ्याने !!!"
 
 
.
.
.
रडकुंडीला आलेला नवरा : "अग्गं, देवाशपथ नाही गं ! तिथेच उभा होतो मी. आणि माझे लक्षदेखील पीठावरच होतं."
 
.
.
.
बायको : "खोटं तर अजिब्बात बोलू नका. व्हाॅट्सऍप नाहीतर फेसबुकवर टाईमपास करत बसले असणार !!! आजकाल बघतेय् मी, तुमचं मुळी घरच्या कामात अजिबात लक्षच नसतं हल्ली !!!"
 
 
.
.
.
कावलेला नवरा : "नाही माझ्या आई ! उग्गाच बोंबलतेस कशाला ? झालंय तरी काय एवढं ??? पाया पडतो मी तुझ्या !!!"
 
.
.
.
बायको (अर्थातच सदाशिव पेठी पुणेरी) : 
"मग सांगा बघू, चपात्या जळल्याच कशा माझ्या ???"

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

दीपिका पदुकोण दुसऱ्यांदा आई होणार, आनंदाची बातमी शेअर केली

Bigg Boss Marathi 6 Winner तन्वी कोलते ठरली विजेती! ट्रॉफीसह जिंकली लाखो चाहत्यांची मने

धुरंधर २' ने इतिहास रचला, सर्वाधिक कमाई करणारा भारतातील तिसरा सर्वात मोठा चित्रपट ठरला

'टाईम' मासिकाच्या १०० सर्वात प्रभावशाली व्यक्तींच्या यादीत रणबीर कपूरचा समावेश; यादीत स्थान मिळवणारा एकमेव भारतीय अभिनेता

अभिनेत्री लारा दत्ताने वयाच्या २२ व्या वर्षी मिस युनिव्हर्स बनून इतिहास रचला; बॉलिवूडमध्ये शानदार पदार्पण

सर्व पहा

नवीन

"मराठी येत नसेल तर परवाना रद्द होईल," अभिनेता रितेश देशमुखने प्रताप सरनाईक यांच्या निर्णयाला पाठिंबा दिला

मे महिन्यात गोवा ट्रिप फायदेशीर का नाही?

संजय लीला भन्साळी आणि केतन मेहता जय सोमनाथ'साठी एकत्र आले

लालपरीचे ब्रँड ॲम्बेसिडर: अभिनेता रितेश देशमुख आणि जेनेलिया यांची 'एसटी' (MSRTC) चे नवीन ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली

रणवीर सिंगच्या शाही शैलीच्या 'धुरंधर'ने नवा इतिहास रचला

पुढील लेख
Show comments