Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

वृद्धधश्रमाला पर्याय

Webdunia
शुक्रवार, 28 एप्रिल 2017 (22:32 IST)
काल मी माझ्या एका जुन्या मित्राला भेटायला गेलो होतो . त्याचा आलिशान 3 bhk फ्लैट होता . सजावट छान केली होती. 3 ही बेडरूम ला अलग अलग रंग होते . घरात वयस्कर सगळेच होते . मुलगा सून नातवंड दिसली नाहीत. तो म्हणाला होता की मला दोन मुलगे आहेत . तीन नातू व दोन नाती आहेत . पण कोठेही घरात त्याचा वावर दिसत नव्हता. मुलांसाठी मी येताना खाऊ आणला होता . आपल्याकडे खालीहात जाण्याची पध्दत नसल्यामुळे मी नेहमी प्रमाणेच गेलो . 
पण न राहवून मी शेवटी गप्पांच्या ओघात विचारले ....मित्रा  ,  अरे मुलं-नातवंड दिसत नाहीत . 
आणि.... 
तो समजला... त्याने मला संपूर्ण सगळ्यांची ओळख करून दिली . 
" हे थोरल्या मुलाचे सासू-सासरे , व हे धाकट्या मुलाचे सासू-सासरे . व आम्ही दोघे असे सर्व एकत्र रहातो ." 
 
आमच्या रूम वेगवेगळ्या आहेत . पण आमच किचन एकच आहे. आम्ही आमच्या सवयी आवडी निवडी ज्या एकच आहेत त्या सामुहिक साजऱ्या करतो . व एक आड एक दिवस प्रत्येक जण आपापल्या आवडी निवडी नुसार अटेंड करतो. जे वृद्धाश्रमात असते तसेच आम्ही या घरात असतो . 
 
आमची मुले कामावर जाताना मुले आमच्याकडे सोपवून जातात व परत घरी आल्यावर येथे आम्ही सर्वजण एकत्रित चहापणी नाष्टा करून ते मुलाना घेऊन त्यांच्या फ्लॅटमध्ये जातात . त्यांचे फ्लॅट आमच्या समोरच्याच बिल्डींग मध्ये फक्त एक 10 व्या मजल्यावर व एक 7 व्या मजल्यावर असे प्रत्येकी 2.5 bhk चे फ्लॅट आहेत. व आमचा हा पाचव्या मजल्यावर थ्री बीएचके . 
 
आम्ही खूप मजेत आहोत. आम्हाला प्रायव्हसी पण आहे . आम्ही गावी जाताना आपापल्या बेडरूमला लॉक करून जातो. घरातले सर्व सामान मुलेच भरतात . स्वयंपाक आम्ही करतो . पण बाकी वर कामास ,  झाडूपोछाला बाई आहे . 
आणि आम्ही खूप खूप आनंदात  जीवन जगतो . 
मला नाटकं आवडतात व माझ्या व्याह्याना सिनेमे आवडतात.
 
 मुलाना सुटी लागली . ते आम्हाला सर्वांना घेऊन स्पेशल गाडी काढून फिरायला नेतात . आणि आम्ही सर्व ते दोन दिवस खूप एन्जॉय करतो . 
प्रत्येक जण आपापल्या गोळ्या औषधे संभाळून असतात . 
 
चला मी तुला नातवंडांची गाठ घालून देतो . मग त्याने फोन करून आपल्या दोन्ही मुलाना घरी बोलावले . मुलांचे मला खूप कौतुक वाटले . 
15 मिनिटात नातवंडे सुनांसह दोन्ही मुलगे हजर . नातवंड सुध्दा आजोबा नाना आबा करीत आली . 
मला सूनानी जेवणाचा आग्रह केला . दोन्ही सुना येथे सख्ख्या बहीणी सारख्या वावरत होत्या. मला खूप कौतुक वाटले त्यांचे. 
 
 हेच खरे सुखी कुटुंब.

अयोध्या विशेष : राम जन्मस्थळ अयोध्यांचे 10 मुख्य प्रेक्षणीय स्थळ...

कुणकेश्वरचा इतिहास

सफर निसर्गरम्य बूंदीची

पलरुवी अर्थात दुधाचा धबधबा

रामेश्वरम्: एक प्रसिद्ध तीर्थक्षेत्र

IRCTC Vaishno Devi Package स्वस्तात वैष्णोदेवी दर्शन ! निवास, भोजन आणि वाहतूक सामील

गॅलक्सी गोळीबार प्रकरण : हाय कोर्टाने आरोपीच्या मृत्यूचा रिपोर्ट मागितला, पोलीस कोठडीमधील आत्महत्या प्रकरण

शॉर्ट्स घालून मंदिरात पोहचली अंकिता लोखंडे, लोक संतापले

कुठे आहे बगलामुखी देवी चमत्कारी दरबार? आश्चर्यकारक शक्तींनी संपन्न परिसर

Panchayat 3 Trailer relese : पंचायत 3 चा धमाकेदार ट्रेलर आला

पुढील लेख
Show comments