Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

गोष्ट खूप छोटी असते हो....

गोष्ट खूप छोटी असते हो....
, शनिवार, 12 ऑक्टोबर 2019 (13:56 IST)
तुम्ही गाडीतुन जातांना, न ऊतरता रस्त्यावरच्या माणसाला एखादा पत्ता विचारला तर ब-याचदा तो मिळतच नाही, पण उतरुन जर, दादा पत्ता सांगता का ? असं विचारलं तर काहीतरी हिंट नक्कीच मिळते....
गोष्ट खूप छोटी असते हो, करायची.
 
स्टेशनवर तुम्हाला सोडायला आलेल्याला, घरी पोचल्यानंतर तुम्ही फोन केला नाही तर फारसं बिघडत नाही, पण फोन केला तर नातं नक्कीच जुळतं...
गोष्ट खूप छोटी असते हो,करायची.
 
अंधारात तुम्ही कधी पाय अडखळुन पडलात, तसाच मागचाही पडू शकतो. तिथेच थोडं थांबून मागच्याला सावध केलं, तर अंधारातही त्याचे डोळे बोलतात....
गोष्ट खूप छोटी असते हो, करायची.
 
आपापलं सामान घेऊन तर सगळेच रेल्वेचा दादरा चढतात. पण त्याही वेळी एखाद्या आजीचा हात धरुन तिला मदत केली तर, तिने घट्ट धरलेला हात आपली आई आठवून देतो....
गोष्ट खूप छोटी असते हो, करायची.
 
बॅंकेत कामाला गेल्यावर, कोण्या  एकाला स्लिप घेतल्यावर पुढे काय करायचं उमगत नसतांना, तुम्ही त्याला स्वत:हुन मदत केली तर, तुमचा पेन परत करतांना तुमच्याकडे तो जे पहातो ना, ते खूप छान असतं....
गोष्ट खूप छोटी असते हो, करायची.
 
घंटागाडीत तुमचा कचरा घेणारा तुम्हाला रोजच भेटतो. कधी त्याला ग्लोव्ह्ज द्यायचे. कधी skin चं मलम देऊन टाकायचं...
गोष्ट खूप छोटी असते हो,करायची.
 
कमी जागेत बाईक पार्क करतांना तिरक्या स्टॅंडवर न लावता, सरळ स्टॅंडवर लावून मागच्यालाही थोडी जागा ठेवली तर त्याचं thank you ऐकायला मस्त वाटतं....
गोष्ट खूप छोटी असते हो, करायची.
 
किराणा दुकानाच्या गर्दीत, तिने घेतलेल्या सामानाचा ढिग पहाणा-याने त्या ताईची पिशवी आपण धरुन ठेवली तर सामान नीट ठेवणं तिला सोप्पं जातं.
माणसा माणसातील निष्कारण असलेली बंधनं गळून पडतात...
गोष्ट खूप छोटी असते हो, करायची.
 
जगण्याच्या रोजच्या घबडग्यात प्रत्येकाला हे सुचत़च असं नाही.
आपण द्यायचा सल्ला त्याला, जसा मी देतोय.
वाढवायचं प्रेम माणसा माणसातलं...
गोष्ट खूप छोटी असते हो, करायची.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

‘बाला’चा ट्रेलर नुकताच रिलीज