Festival Posters

आमचे आई बाप म्हातारे होतात...!

Webdunia
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018 (12:24 IST)
कालाय तस्मै नम: 
 
वर्षे अशीच सरतात, आमचे संसार फुलू लागतात  
आणि बघता बघता, आमचे आई बाप म्हातारे होतात...!
 
हौसमजा, जेवणखाण, त्यांच आतां कमी होत चाललय
पण फोनवर सांगतात, आमच अगदी उत्तम चाललय
अंगाला सैल होणारे कपडे, गुपचूप घट्ट करून घेतात
वर्षे अशीच सरतात, बघता बघतां, 
आमचे आई बाप म्हातारे होतात...!
 
कोणी समवयस्क “गेल्या”च्या बातमीने हताश होतात, 
स्वत:च्या पथ्य पाण्यांत, आणखीन थोडी वाढ करतात 
आमच्या ‘खाण्यापिण्याच्या’ सवयींवर  नाराज होतात, 
वर्षे अशीच सरतात, बघता बघतां, 
आमचे आई बाप म्हातारे होतात...!
 
आधार कार्ड, पॅन कार्ड जीवापाड सांभाळतात,
इन्कम टॅक्सच्या भीतीने कावरे बावरे होतात 
मॅच्युर झालेली एफडी नातवासाठी रिन्यू करतात 
वर्षे अशीच सरतात, बघता बघतां, 
आमचे आई बाप म्हातारे होतात...! 
 
पाठदुखी, कंबर दुखीच्या तक्रारी एकमेकांकडे करतात  
अॅलोपाथीच्या साइड इफेक्टची वर्णने करतात 
आयुर्वेदावरचे लेख वाचतात, होमिओपॅथीच्या गोळ्या खातात 
वर्षे अशीच सरतात, बघता बघतां, 
आमचे आई बाप म्हातारे होतात...! 
 
कालनिर्णयची पान उलटत येणाऱ्या सणांची वाट बघतात 
एरवी न होणाऱ्या पारंपारिक पदार्थांची जय्यत तयारी करतात 
आवडीने जेवणाऱ्या नातवाकडे भरल्या डोळ्याने पहातात  
वर्षे अशीच सरतात, बघता बघतां, 
आमचे आई बाप म्हातारे होतात...!
 
माहित आहे हे सगळ, आता लवकरच संपणार 
जाणून आहोंत, हे दोघेंही आता एका पाठोपाठ जाणार 
कधीतरी तो अटळ प्रसंग येणार,काळ असाच पळत रहाणार
वर्षे अशीच सरत रहाणार, 
 
बघता बघतां आम्ही देखील असेच, आमच्या मुलांचे म्हातारे आई बाप होणार....!!

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

संजय मिश्रा आणि नीना गुप्ता यांनी प्रेक्षकांना 'वध २' मोठ्या पडद्यावर पाहण्याचे आवाहन केले

"मिर्झापूर: द मूव्ही" च्या प्रदर्शनाची तारीख जाहीर

सनी देओल आणि अक्षय खन्ना तीन दशकांनंतर पुन्हा एकत्र येत आहे, ते नेटफ्लिक्सच्या कोर्टरूम ड्रामा "इक्का" मध्ये दिसणार

"दो दीवाने सेहर में" चा ट्रेलर प्रदर्शित, सिद्धांत आणि मृणाल या व्हॅलेंटाईन आठवड्यात एक भावनिक प्रेमकथा घेऊन येत आहे

विजय देवरकोंडा सोबतच्या लग्नाच्या अफवांवर रश्मिका मंदानाने मौन सोडले, दिली ही प्रतिक्रिया

सर्व पहा

नवीन

"माझ्याकडे पैसे नाहीत..." तिहार तुरुंगात आत्मसमर्पण करण्यापूर्वी राजपाल यादवने भावनिक विधान केले

लाईव्ह कॉन्सर्टमध्ये हरवला मुलगा; गायक सोनू निगम ने कुटुंबाशी भेट घडवून आणली

सनी देओलच्या 'लाहोर १९४७' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर; या तारखेला प्रदर्शित होणार

Valentine Destination in Maharashtra प्रेम साजरं करण्यासाठी महाराष्ट्रातील सर्वोत्तम 'व्हॅलेंटाईन' डेस्टिनेशन्स

सनी देओलच्या 'लाहोर 1947' चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर, हा चित्रपट या दिवशी थिएटरमध्ये दाखल होईल

पुढील लेख
Show comments