suvichar

आणि दुःख confuse होतं....

Webdunia
गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (11:07 IST)
त्रासाने भरलेल्या खोक्यावर
मी "आनंद"असं लिहिते
...आणि दुःख confuse  होतं
 
येणाऱ्या प्रत्येक संकटाला
एक छानशी smile देते
...आणि दुःख confuse होतं
 
खरं सांगायचं तर खूप वेळा
मी कोलमडून जाते
सगळं संपलं असं वाटून
अगदी गर्भगळीत होते
कुठूनतरी देव येऊन
माझ्या हातात त्याचा हात देतो
...आणि दुःख confuse होतं
 
संकटाच काय? ती येणारच
आल्यावर थोडं फार छळणारच
आपण स्थिर राहायचं काही काळ
संकटाचं पाणी पाणी होणारच
आलेलं संकट हसता हसता
नकळत नाहीसं होतं
...आणि दुःख confuse होतं
 
किती दिवसाचं हे आयुष्य
आज ना उद्या संपणारच
अमुक आहे-तमुक नाही 
आपलं चालू राहणारच
फाटक्या गोधडीत पाय आखडून
मी सुखाने झोपी जाते
...आणि दुःख confuse होतं
 
म्हटलं तर जीवन सुंदर 
म्हटलं तर वाईट आहे
मग त्याला सुंदर म्हणण्यात 
सांगा काय वाईट आहे? 
जीवनाकडे बघण्याचा
मी चष्मा विकत घेते
...आणि दुःख confuse होतं.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

भारती आणि हर्ष घेणार घटस्फोट? रंगणाऱ्या चर्चांवर अखेर भारतीने सोडलं मौन!

ओटीटी प्लॅटफॉर्म ‘अभिजात मराठी’चे कान्स २०२६ मध्ये भव्य अनावरण

कान्सच्या रेड कार्पेटवर 'अशोक सराफ, निवेदिता सराफ' यांची एन्ट्री

कमल हसन यांनी सीएम थलपथी विजय यांची भेट घेतली आणि 6 प्रमुख मागण्या मांडल्या

अमिशा पटेलने वयाच्या ५० व्या वर्षी तिला हवा असलेला जोडीदार कसा असावा हे उघड केले

सर्व पहा

नवीन

अमिताभ बच्चन आणि रणवीर सोबत काम केलेला अभिनेता हत्येप्रकरणी दोषी आढळला; नाव बदलून १२ वर्षे चित्रपटांमध्ये काम केले

Joke पेन्शन पेमेंट विभागाचा अधिकारी बेशुद्ध झाला

सौंदर्याची राणी ऐश्वर्या राय कान्समध्ये अवतरली

राजकुमार राव अभिनीत 'रफ्तार'ला प्रदर्शनाची नवीन तारीख मिळाली असून, तो आता २०२६ च्या दसऱ्याला प्रदर्शित होईल

Haunted places in Nainital नैनितालमधील ही ५ हॉंटेड ठिकाणे संध्याकाळ होताच शांत होतात

पुढील लेख
Show comments