Festival Posters

किती सहज म्हणतोस रे ...

Webdunia
शनिवार, 6 ऑक्टोबर 2018 (00:51 IST)
किती सहज म्हणतोस रे ...
म्हणे एक प्लेट सुख आण पट्कन ...
बाजारात जा आणि 
सहनशक्ती घेऊन ये बरं झटकन ...
 
भिजत घालेन काही वेळ
संयमाच्या पाण्यात.
बांधून घालेन काही काळ 
घट्ट ओठांच्या फडक्यात.
 
दुर्लक्षाच्या उबेमध्ये 
छान मोड येतील.
सुखाचे ताजे ताजे 
कोंब दिसू लागतील.
 
माया आणि आपुलकीचा
फर्मास मसाला.
कष्ट आणि मेहनतीचा 
खर्डा घालू चवीला.
 
परस्पर स्नेहाचं 
खोबरं घालू छानसं.
बंधन आणि मर्यादांचं 
मीठ घालू इवलुसं.
 
साखरपेरणी करू थोडी
गोड गोड शब्दांची.
कोथिंबीर घालू थोडी
आस्था आणि समजुतीची.
 
कटू शब्द, राग, लोभ
चुलीमध्ये घालू.
स्वार्थ आणि गैरसमज 
भाजूनच काढू.
 
तयार झाली डिश आपली
सजवायला घेऊ.
तृप्ती आणि कौतुकाची 
साय घालू मऊ.
 
बघितलंस ??
 
सुख ही डिश नाही 
एकट्याने शिजवायची.
सर्वांनीच रांधायची नि 
मिळूनच खायची. 
 
© स्वाती जोशी

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

"धुरंधर" मधील अक्षय खन्नाच्या अभिनयाने अमिषा पटेल प्रभावित झाली, म्हणाली...

अक्षय खन्नाने लग्न का केले नाही? लग्नच करायचं नाही हे ठरवण्यामागील कारण आहे तरी काय?

एपिक सिनेमा आकार घेता आहे: तमन्ना भाटिया दूरदर्शी दिग्गज वी. शांताराम यांच्या भव्य बायोपिकचा भाग; पडद्यावर साकारतील ‘जयश्री’

प्रसिद्ध गुजराती अभिनेता श्रुहद गोस्वामी यांची 'क्यूंकि सास भी कभी बहू थी' मालिकेत खास एंट्री!

अभिनेत्री अपहरण आणि लैंगिक अत्याचार प्रकरणातून मल्याळम सुपरस्टार दिलीपची निर्दोष मुक्तता

सर्व पहा

नवीन

"क्युँकी सास भी कभी बहू थी" मध्ये येणार लीप; तुलसी–मिहिरचं आयुष्य आता वेगवेगळ्या वाटांवर!

अभिनेत्री प्राजक्ता माळी फॅन्सवर रागावली

दिलीप कुमार आणि त्यांच्यापेक्षा २२ वर्षांनी लहान असलेल्या सायरा बानू यांची प्रेमकहाणी खूप खास होती

New Year 2026: गोव्यात फक्त समुद्रकिनारेच नाही तर ही ठिकाणे देखील सुंदर आहे

व्यक्तिमत्व आणि प्रसिद्धीच्या अधिकारांच्या संरक्षणासाठी सलमान खानने दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतली

पुढील लेख
Show comments