Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

"असं काय बघताय ?

Webdunia
बुधवार, 21 नोव्हेंबर 2018 (16:52 IST)
ती घर आवरत होती...
तो सारखं पहात होता...
नजरेत त्याच्या कौतुकाचा 
दिवा जळत होता!
 
तिलाही नवल वाटलं 
त्याची अशी नजर पाहून 
लाजली ती हलकेच 
अन् गेली भारावून !
 
"असं काय बघताय ?
हवंय का काही ?"
"...बघू दे ना असंच 
नकोय दुसरं काही!"
 
"तुमचं उगाच काही तरी"
म्हटलं..पण सुखावली मनात...
त्यानं दुखावली कित्येकदा 
पण विसरली सारं क्षणात!
 
"आज स्वारी अशी फार्मात 
असं काय झालं ?
काय घेऊन बसलात 
माझं कौतुक मेलं !"
 
"राबराब राबलो 
अन् फाइल पूर्ण केलं 
एका चुकीचं निमित्त अन् 
बॉसनं नको तेवढं झापलं"
 
पुरुष असलो तरी 
डोळे आज पाणावले 
"हिचंही असंच होत असेल"
ह्रुदय आतून हेलावले !
 
सारंच आवरुन कशी तू 
हसून स्वागत करतेस ?
कौतुकाची थाप नाहीच 
पण राग मात्र झेलतेस
 
आज मला शब्द दे,
असं सोसणं तू बंद कर 
चुकलो मी कुठं तर 
दाखवून देणं सुरू कर
 
तुझ्या गप्प राहण्यानं 
सारे गृहित तुला धरतात 
बाहेरचा राग वैताग 
फक्त तुझ्यावर काढतात"
 
पापण्यांच्या कडा पुसत 
ती हळूच बोलली,
"बाकी सगळं जाऊ दे,
गंगेला मिळू दे 
अशीच कौतुक थाप 
फक्त अधूनमधून मिळू दे!"
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Rani Mukerji: व्यावसायिक चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जीने साकारल्या या भूमिका

चंदू चॅम्पियनसाठी कार्तिक आर्यन महाराष्ट्रीयन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित

'टेस्ट' चित्रपटाचा नवीन टीझर प्रदर्शित, आर माधवनची व्यक्तिरेखा उघड

Orry वर वैष्णोदेवी बेस कॅम्पमध्ये दारू पिल्याचा आरोप, मंदिराजवळ दारू आणि मांसाहारी पदार्थांच्या विक्रीवर २ महिन्यांसाठी बंदी

‘ये रे ये रे पैसा ३’ चित्रपट १८ जुलैला होणार प्रदर्शित

सर्व पहा

नवीन

बायकोचे नवऱ्याच्या बाबतीतले "सप्तसूर"

मडगाव एक्सप्रेस'च्या पहिल्या वर्धापनदिना निमित्त दिग्दर्शक कुणाल खेमूने केली मोठी घोषणा

सलमान खानच्या सुरक्षेमुळे सिकंदरचा प्लॅन बदलला, ट्रेलर लाँच कार्यक्रम रद्द!

भेट देण्यासाठी अमेरिकेतील सुंदर ठिकाणे

Rani Mukerji: व्यावसायिक चित्रपटांव्यतिरिक्त राणी मुखर्जीने साकारल्या या भूमिका

पुढील लेख
Show comments