Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

प्रत्येक स्त्री च्या डोक्यावर

Webdunia
गुरूवार, 24 जानेवारी 2019 (12:15 IST)
एक पाण्यानं भरलेली अद्श्य घागर असते .....
तिचा तोल सांभाळतच तिला आयुष्य काढायचे असते....
 
आणि प्रत्येकीच्या घागरीत असते,
विचारांची,जाणीवांची,जबाबदारीची संवेदना आणि सासर-माहेरचा समतोल ठेवूनच तिला चालायचं असतं...
 
आणि ते ही...
मान ताठ ठेऊनच चालायचंय तिने....
आणि चेहर्‍यावर ठेवायचंय खरं किंवा उसनं हसू....
 
घागरीतील पाणी कधी कधी खूप 
हिंदकळते...
कधी शिंतोडे उडवते...
खळखळून तिथल्या तिथेच गिरक्या मारते..
कधी घागरीच्या कडेवर जोरजोरात ठेचकाळते....
पण तरीही ते घागरीतच
राहते.....
 
पाणी हिंदकळताही
उपयोगी नाही
घागर सुटूनही 
चालणार नाही.....
 
पायी काटे, डोईवर रणरणतं उन...
तरीही  ती वाहतेच आहे पाणी युगानूयुगे.....
 
आपल्या वाटणीचा हा पाणवठा भरतेच आहे.....
तन मन थकले तरी ...कर्तव्य तिचे चालू आहे....
 
तरीही ....
पाणी आणि घागरीचा तोल ती आदी काळापासून सांभाळत आहे....
 
असंही एक ऋतूचक्र आणि अशीचही एक तू...
वंदन तुम्हा प्रत्येकीला....

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पूनम पांडे जाणार महाकुंभाला, नेटकऱ्यांनी ट्रोल केले

देवा' मध्ये शाहिद कपूरची दुहेरी भूमिका आहे का?

ममता कुलकर्णी किन्नर आखाड्याची महामंडलेश्वर का बनली? हॉट अभिनेत्रीच्या या निर्णयामागील कारण जाणून घ्या

पंकज उधास यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल मुलीने व्यक्त केली कृतज्ञता, सरकारचे आभार मानले

जाट'ची रिलीज डेट फायनल, सनी देओल या दिवशी अक्षय कुमारशी भिडणार

सर्व पहा

नवीन

अभिनेता सलमान खानची बहीण श्वेता रोहिराचा झाला भीषण अपघात

रोमँटिक हनिमूनसाठी भारतातील या 5 ठिकाणी भेट द्या

अर्चना पूरन सिंगचा शूटिंग दरम्यान अपघात झाला आरोग्य अपडेट शेअर केले

विक्रांत मॅसीची डॉन 3 मध्ये एन्ट्री, खलनायक म्हणून रणवीर सिंगशी स्पर्धा करणार

शनिवार वाडा पुणे

पुढील लेख
Show comments