Dharma Sangrah

चला थोडं हसू या...

Webdunia
बुधवार, 30 सप्टेंबर 2020 (16:30 IST)
1  मास्तर- गण्या तुझा जन्म कुठे झाला ?
गण्या - मास्तर हैद्राबादला 
मास्टर - बरं, आता त्याची स्पेलिंग सांग बघू..
गण्या - अहो, मास्तर मी विसरलोच माझा जन्म तर मुंबईत झाला आहे. 
 
2 शिक्षकाने विद्यार्थ्यांना चार पानी निबंध लिहायला सांगितला.
विषय - 'आळस म्हणजे काय?'
झम्प्यानं चारही पानं कोरी ठेवली आणि शेवटी त्यांनी लिहिले तरी काय?
'यालाच म्हणतात आळस'....
 
3 मास्तर - दगडू सांग रे बादशहा अकबरने कुठ पर्यंत राज्य केले ?
दगडू - पान नं. 19 ते 47.
 
4 मास्तर - राम्या तू नेहमी शाळेत टोपी का बर घालून येतोस?
राम्या - मास्तर, कारण कोणालाही कळायला नको की 
माझ्या डोक्यात चालले तरी काय आहे ते. 
 
5 मास्तर - सांगा बघू सगळ्यात जुना प्राणी कोणता?
पक्या - मास्तर, झेब्रा.
मास्तर - असं का बरं ?
पक्या - मास्तर कारण तो ब्लॅक आणि व्हाईट असतो ना.
 
6 आई - "बंड्या आज काय शिकवले शाळेत."
गण्या - "लिहायला शिकवले."
आई -  "अरे वा छान! काय लिहले?"
गण्या - "काय माहीत? अजून वाचायला नाही शिकवले."
 
7 मास्तर - एका मुलाला सांग तुझे नाव आणि तुझ्या वडिलांचे नाव.
सूर्यप्रकाश - माझे नाव सूर्यप्रकाश आणि माझ्या वडीलांचे नाव चंद्र प्रकाश.
मास्तर - शाब्बास ! आता हेच मला तू इंग्रजीत सांग बघू.
सूर्यप्रकाश - माय नेम इज सनलाइट, अँड माय फादर नेम इज मुनलाइट.
 
8 मास्तर - झम्प्या, तुला हे 50 मार्क देताना मला फार आनंद होत आहे.
झम्प्या - मास्तर आपण आपल्या या आनंदाला अजून द्विगुणित करू शकता.
मास्तर - ते कसे काय?
झम्प्या- मला पूर्ण पैकीच्या पैकी मार्क देऊन.
 
9  मास्तर - राम्या सांग रे .. 
कडधान्य म्हणजे काय ?
राम्या - मास्तर शेताच्या कडं कडं ने जे धान्य उगवतात.  त्यालाच कडधान्य असे म्हणतात.  

10 गण्या - डॉक्टर मला जेवण केल्यावर भूक लागत नाही,
झोपून उठल्यावर झोप येत नाही, काय करू?
डॉक्टर- रात्री उठून उन्हामध्ये बसत जा, सगळ ठीक होईल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

नियमित योगासनांमुळे तुमच्या शरीरासोबतच मानसिकदृष्ट्याही मजबूत राहण्यास मदत होते

उकळता चहा किंवा कॉफी पिण्याचे दुष्परिणाम जाणून घ्या

एकादशी विशेष उपवासाची बटाटा भजी पाककृती

चिंता करणे थांबवण्यासाठी Scheduled Worry Time पाळा

बीटेक इन एव्हियोनिक्स इंजिनिअरिंग करून करिअर बनवा

पुढील लेख
Show comments