Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हा हिंददेश माझा

Webdunia
मंगळवार, 13 ऑगस्ट 2024 (12:11 IST)
आनंदकंद ऐसा । हा हिंददेश माझा ॥
 
सत्यास ठाव देई, वृत्तीस ठेवि न्यायी
सत्यास मानि राजा । हा हिंददेश माझा ॥
 
जगदीश जन्म घेई, पदवीस थोर नेई
चढवी स्वधर्मसाजा । हा हिंददेश माझा ॥
 
जनकादि राजयोगी, शुक वामदेव त्यागी
घुमवीति कीर्तीवाजा । हा हिंददेश माझा ॥
 
गंगा हिमाचलाची, वसती जिथें सदाची
होऊनि राहि कलिजा । हा हिंददेश माझा ॥
 
पृथुराज सिंह शिवजी, स्वातंत्र्यवीर गाजी
करिती रणांत मौजा । हा हिंददेश माझा ॥
 
तिलकादि जीव देहीं, प्रसवूनि धन्य होई
मरती स्वलोककाजा । हा हिंददेश माझा ॥
 
जगिं त्याविना कुणीही, स्मरणीय अन्य नाहीं
थोरांत थोर समजा । हा हिंददेश माझा ॥
 
पूजोनि त्यास जीवें, वंदोनि प्रेमभावें
जयनाद हाचि गर्जा । हा हिंददेश माझा ॥
 
कवी- आनंद कृष्णाजी टेकाडे

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साडी नेसल्याने कॅन्सर होऊ शकतो का? ही सुरुवातीची लक्षणे असू शकतात

Amla Navami 2024: आवळा नवमीला पूजा विधी

वामनस्तोत्रम्

नारायणस्तोत्रम् आणि नारायणाथर्वशीर्षोपनिषत्

Tulsi vivah 2024: शालिग्रामचा विवाह तुळशीशी का करतात?

सर्व पहा

नवीन

ब्लॅक कॉफी चे आरोग्यासाठी फायदेशीर आणि तोटे जाणून घ्या

हिवाळ्यात कोरड्या त्वचेची, घरच्या घरी नैसर्गिक पद्धतीने काळजी घ्या

डोकेदुखीपासून मुक्त होण्यासाठी या सोप्या घरगुती उपायांचा अवलंब करा

योगाच्या या 5 टिप्सचा अवलंब केल्यास नेहमी निरोगी राहाल

श्रीसर्वोत्तम रौप्य महोत्सवाचा प्रथम दिवसीय सोहळा

पुढील लेख
Show comments