Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

हितोपदेशातील मनोरंजक कथा : निर्दोष गाढव

Webdunia
सोमवार, 4 नोव्हेंबर 2024 (20:30 IST)
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक धोबी राहत होता. या धोबीने घराच्या रक्षणासाठी एक कुत्रा आणि दैनंदिन कामासाठी गाढव पाळले होते. धोबी गाढवाकडून खूप काम करून घ्यायचा. तो गाढवाच्या पाठीवर बराच भार वाहायचा.
 
एकदा रात्री धोबी घरात शांत झोपलेला असताना एक चोर शिरला. धोबीने गाढव आणि कुत्रा अंगणात बांधलेले होते आणि त्यांनी चोराला आत येताना पाहिले, परंतु कुत्र्याने मालकाला सावध केले नाही.   
 
आता गाढव कुत्र्याला म्हणाले की, - मित्रा ! मालकाच्या घरात चोर शिरला आहे. चोराच्या आल्याची माहिती मालकाला देणे तुझे कर्तव्य आहे. तू मालकाला उठवत का नाही आहेस?
 
आता यावर कुत्रा चिडून म्हणाला की, "काळजी करू नकोस ."तुला माहिती आहे, मी रात्रंदिवस घराचे रक्षण करतो, पण मालकाला माझी किंमत नाही. ठीक आहे, चोरी होऊ द्या, त्याचे नुकसान होईल, तेव्हाच त्याला माझी किंमत कळेल.
 
गाढवाला कुत्र्याचे म्हणणे पटले नाही. गाढवाने कुत्र्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण हट्टी कुत्र्यावर काहीच परिणाम झाला नाही. आता मात्र गाढव खूप अस्वस्थ झाले. तो पुन्हा कुत्र्याशी वाद घालायला गेला नाही. त्याने,मालकाला मदत करावी असे ठरवले. म्ह्णून गाढव मोठ्या मोठ्याने ओरडू लागले. त्यामुळे चोर पळून गेलेत. पण धोबी गाढ झोपेतून जागा झाला आणि हातात काठी घेऊन बाहेर आला. तसेच कुत्रा शांत बसला होता आणि गाढव जोरात ओरडत होते.  हे पाहून त्याला वाटले की गाढवाने आपली झोप भंग करण्यासाठी हे केले आहे. धोबीला खूप राग आला आणि त्याने गाढवाला खूप मारले. बिचारे गाढव अखेरीस चूक नसतांना गतप्राण झाले.
 
तात्पर्य : विचार केल्याशिवाय कोणतेही काम करू नये. 

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

फायनान्शिअल मॅनेजमेंट कोर्स मध्ये एमबीए करा

Vaginal Itching योनीला दररोज खाज येते? या 3 प्रभावी घरगुती उपायांनी आराम मिळवा

Beauty Advice : घरीच बनवा केमिकल फ्री ब्लश

शिंक येणे नेहमीच अशुभ नसते, जाणून घ्या कधी शुभ असते

Margashirsha Guruvar 2024 मार्गशीर्ष गुरुवार कधी पासून? किती गुरुवार, संपूर्ण माहिती जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Amla During Periods मासिक पाळी दरम्यान आवळा खाऊ शकतो का? Amla पीरियड्सवर परिणाम करतो का?

पौष्टिक मेथीचे कटलेट रेसिपी

पीएचडी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये करिअर करा

आलं पुरुषांसाठी किती फायदेशीर आहे?

जास्वंदापासून बनवलेल्या कंडिशनरने केसांना चमक आणा

पुढील लेख
Show comments