Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

बोध कथा : स्वत:चा नाश

Webdunia
गुरूवार, 26 जुलै 2018 (12:27 IST)
एक तरुण माणूस फार छान्दिष्ट व उधळ्या होता. त्याने आपली सगळी मिळकत दारू, जुगारासारख्या व्यसनात घालविली. मग तो दरिद्री होऊन भिकार्‍यासारखा अरण्यात फिरू लागला. हिवाळ्यात एकेदिवशी चांगले कडक उन्ह पडले होते. अशावेळी तो माणूस नदीकाठी फिरत असता जवळच्या एका आंब्याच्या झाडावर एक कोकिळा बसलेली त्याने पाहिली. कडक उन्ह व कोकिळा पाहून त्याला वाटले की, खरंच उन्हाळा आला व आता पांघरुणाची काही गरज नाही, असा विचार करून त्याने आपले काही कपडे गहाण ठेवले व पैसे काढून तो आपल्या मित्राबरोबर जुगाराचा डाव खेळायला गेला. तेथे त्याने सगळे पैसे जुगारात घालविले. संध्याकाळी थंडी पडली; तेव्हा त्याला थंडीमुळे आजारपण आले. उन्हाळा असून असे कसे झाले याचे आश्चर्य करीत तो पुनः नदीवर गेला तर तेथे तो कोकीळ पक्षी थंडीने गारठून झाडाखाली मरून पडलेला त्याला दिसला. तो प्रकार पाहून तो चांगलाच शुद्धीवर आला व मग त्या पक्ष्याला म्हणाला, अरे, मी तुझ्यावर विश्वास ठेवून आपले कपडे गहाण ठेवण्याचा मूर्खपणा केला, तू मला फसवलंस आणि स्वतःचाही नाश करून घेतलास.
 
तात्पर्य- व्यसनी माणूस काहीवेळा इतका बेसावध असतो की, त्याला सभोवतालच्या गोष्टीचेही भान राहात नाही.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उन्हाळ्यात करा हे 5 सोपे व्यायाम, तुमचे वजन झपाट्याने कमी होईल

पौराणिक कथा : एकलव्याचे समर्पण

Cow Essay in Marathi गाय 20 ओळी खूप सोपा मराठी निबंध

दर ४१ वर्षांनी हनुमानजी कोणाला भेटायला येतात?

Baisakhi 2025 Wishes बैसाखीच्या शुभेच्छा

सर्व पहा

नवीन

Hanuman Jayanti 2025 बजरंगबलींना विशेष नैवेद्य अर्पण करा

उष्माघातापासून त्वरित आराम मिळवण्यासाठी हे 7 सोपे घरगुती उपाय करा

12वी कॉमर्स नंतर टॉप अकाउंट्स आणि फायनान्स कोर्स करा

चेहऱ्यावरील कोरडेपणा दूर करण्यासाठी या भाज्यांचा रस लावा

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे 10 आश्चर्यकारक आरोग्य फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments