Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

पंचतंत्र कहाणी- लोभी मित्र

bear
, सोमवार, 12 ऑगस्ट 2024 (12:15 IST)
खूप वर्षांपूर्वीची एक गोष्ट आहे. एका गावात दोन मित्र राहत होते. एकदा त्यांनी दुसऱ्या ठिकणी जाऊन धन कमावण्याचा विचार केला. दोन्ही प्रवास करू लागले. रस्त्यात त्यांना एक जंगल लागले. जेव्हा ते जंगलातून जात होते, तेव्हा त्यांना एक अस्वल त्यांच्या दिशेने येतांना दिसले. दोन्ही मित्र खूप घाबरले. त्यातील एक मित्र झाडावर जीव वाचवण्यासाठी झाडावर चढला. पण दुसऱ्या मित्राला झाडावर चढता येत न्हवते त्यामुळे तो खाली उभा राहिला. आता काय करावे समोर त्याला मृत्यू डोळ्यासमोर दिसत होता. तेव्हा त्याने एक युक्ती केली. त्याने आपला श्वास बंद केला आणि जमिनीवर पडून राहिला. व असे दर्शवले की तो मृत्युमुखी पडला आहे. 
 
जेव्हा अस्वल त्याच्या जवळ आले. त्याने जमिनीवर त्या दुसऱ्या मित्राचा वास घेतला व तिथून निघून गेला कारण अस्वल मृत जीवांना खात नाही. अस्वल निघून गेल्यानंतर तो मित्र उठला आणि झाडावर चढलेला मित्र देखील खाली उतरला. पहिला मित्र दुसऱ्या मित्राला म्हणाला मला खूप आनंद झाला. कारण तू जिवंत आहेस. पण मला हे सांग अस्वल तुला कानात काय म्हणाले? दुसरा मित्र म्हणाला की, अश्या मित्राची सांगत सोडून दे जो संकटाच्या वेळी कामास येत नाही. आपल्या मित्राचे हे बोलणे ऐकून पहिला मित्राला लाज वाटली. व त्यादिवसापासून दुसऱ्या मित्राने पहिल्या मित्राशी मैत्री तोडून टाकली. 
 
तात्पर्य- खऱ्या मित्राची ओळख ही संकटात होते.

Edited By- Dhanashri Naik 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बाळ जातो दूर देशा