Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

पंचतंत्र कहाणी : कोल्ह्याची रणनीती

Webdunia
सोमवार, 28 ऑक्टोबर 2024 (20:30 IST)
एका जंगलामध्ये महाचतुरक नावाचा कोल्हा राहायचा. एक दिवस जंगलात त्याला मेलेला हत्ती दिसला. त्याला खूप आनंद झाला. त्याने हत्तीचा मृतदेह मध्ये आपले दात फसविले. पण हत्तीच्या जाड कातडीमुळे त्याचे दात फासले नाही. 
 
तो विचार करू लागला. त्याला दुरून एक सिंह येतांना दिसला. कोल्ह्याने सिंहाचे स्वागत केले व त्याला नमस्कार केला.व म्हणाला की, महाराज मी तुमच्यासाठी हत्तीची शिकार केली आहे. तुम्ही या हत्तीचे मांस खाऊन माज्यावर उपकार करा.पण यावर सिंह म्हणाला की, मी आयती शिकार खात नाही त्यामुळे तूच ही शिकार खा. 
 
कोल्ह्याला आनंद झाला होता. पण तेवढ्यात दुरून एक वाघ येतांना त्याला दिसला. कोल्हा त्या वाघाला म्हणाला की, वाघ दादा तुम्ही इथे कशाला आलेत? मला सिंहाने या हत्तीचे रक्षण करण्यास सांगितलं आहे. सिंहाने हा हत्ती मारून ठेवला आहे. जर तुम्ही ही शिकार खाल्ली तर सिंह तुम्हाला ठार कारेल. 
 
हे ऐकून वाघ तिथून पळून जातो. तेवढ्यात कोल्ह्याला समोरून बिबट्या येतांना दिसतो. बिबट्याचे दात तीक्ष्ण आहे असे कोल्ह्यालाला वाटते. तसेच तो विचार करू लागतो की, असे काहीतरी केले पाहिजे जेणेकरून ते हत्तीची कातडी फाटेल आणि बिबट्या मांसही खाणार नाही. कोल्हा  बिबट्याला म्हणाला की, “प्रिय बिबट्या, तू इथे कसा आलास? तुलाही थोडी भूक लागली आहे का?” पण सिंहाने या हत्तीचे रक्षण करण्याची जवाबदारी माझ्यावर सोपवली आहे. परंतु तुम्ही त्यातील काही मांस खाऊ शकता. सिंह येताना दिसताच मी तुम्हाला सांगेल, मग तुम्ही निघून जा. सुरुवातीला बिबट्याने घाबरून मांस खाण्यास नकार दिला, पण कोल्ह्याने समजूत काढल्यानंतर बिबट्याने काही क्षणातच हत्तीची कातडी फाडली. तसेच बिबट्या मांस खाण्यास सुरुवात करताच कोल्हा बिबट्याला म्हणाला की, पळ सिंह येत आहे. 
 
हे ऐकून बिबट्या पळून गेला. कोल्ह्याला खूप आनंद झाला. त्याने अनेक दिवस त्या हत्तीचे मांस खाल्ले. त्याने त्याच्या बुद्धीने त्याच्या समस्येवर उपाय शोधला.
 
तात्पर्य : बुद्धिमत्तेचा योग्य उपयोग केल्यास सर्वात कठीण काम देखील शक्य होते.

Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अनेक महिने खराब होणार नाही मिठाई, या सोप्या टिप्स अवलंबवा

Healthcare Tips : दिवाळीच्या काळात दमा रुग्णांनी आरोग्याची काळजी घेण्यासाठी टिप्स

आर्थिक संकटातून सुटका हवी असेल तर दिवाळीत हे नक्की खरेदी करा

दिवाळीचे साप्ताहिक राशिभविष्य, जाणून घ्या या आठवड्यात कोणत्या राशींवर देवी लक्ष्मीची कृपा असेल 28 ऑक्टोबर ते 03 नोव्हेंबर 2024

दिवाळीत या जीवांना पाहणे शुभ मानले जाते, जाणून घ्या काय महत्त्व

सर्व पहा

नवीन

चेहरा उजळण्यासाठी हे उपाय अवलंबवा

Weight Loss Drinks: वजन कमी करण्यासाठी हे ड्रिंक घ्या

प्रेम संबंध टिकवण्यासाठी या टिप्सचा अवलंब करा

तेनालीराम कहाणी : मौल्यवान फुलदाणी

Woman Mood ओव्हुलेशन दरम्यान महिला अधिक मूडी बनतात, कारण आणि त्यास सामोरे जाण्याचे मार्ग जाणून घ्या

पुढील लेख
Show comments