Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Kitchen Tips In Marathi

Webdunia
स्वयंपाकघरात महिलांचा बराच वेळ जातो. जेवण बनवण्यापासून अन्नपदार्थांची साठवणूक करेपर्यंत महिलांना बरंच काही करावं लागतं. त्यातच भाज्या, त्यातही पालेभाज्या ताज्या ठेवणं हे मोठं आव्हान असतं. यासाठी स्वयंपाकघरातल्या या टिप्स उपयोगी पडतील. 
 
* पालेभाज्या ओलसर होऊ नयेत यासाठी विशेष काळजी घ्यावी लागते. त्यातच आपल्याकडे विशिष्ट प्रकारचे कंटेनर्स असतातच असं नाही पण पालेभाज्या ताज्या ठेवण्यासाठी सोपी पद्धत वापरता येईल. कंटेनरमध्ये भाजी ठेवा. त्यावर पेपर टॉवेल किंवा टिश्यू पेपर गुंडाळा. त्यावर प्लास्टिक गुंडाळा. पेपर टॉवेलमुळे पालेभाजीतला सगळा ओलावा शोषला जाईल. पालेभाजी बराच काळापर्यंत ताजी राहील. 
 
* लसून सोलणं हे वैतागवाणं काम असतं. यात खूप वेळ जातो. पण लसूण सोलण्याचीही सोपी पद्धत आहे. लसणाच्या पाकळ्य काढून घ्या. या पाकळ्या हवाबंद कंटेनरमध्ये ठेवा. झाकण लावा आणि कंटेनर जोरात हलवा. लसणाची सालं झटपट निघतील. 
 
* रस काढण्यासाठी आपण फळं थोडी नरम करून घेतो. पण याऐवजी रस काढण्या आधी फळं 10 ते 30 सेकंदांसाठी मायक्रोवेव्हमध्ये ठेवता येतील. यामुळे सगळा रस झटपट काढता येईल. 
 
* उकडलेलं अंडं सोलणं ही एक कला आहे. चुकीच्या पद्धतीने अंडं सोलल्यास खराब होतं. अंडं सोलण्याची एक सोपी पद्धत आहे. एका ग्लासमध्ये अंडं ठेऊन त्यात पाणी भरा. ग्लासच्या वरच्या भागावर हात ठेऊन जोरात हलवा. अंडं सोललं जाईल. 
 
* पिझ्झाचा कुरकुरीतपणा टिकून रहावा यासाठी एक सोपा उपाय करता येईल. मायक्रोवेव्हमध्ये पिझ्झासोबत पाण्याचा ग्लासही ठेवा. यामुळे पिझ्झाचा कुरकुरीतपणा टिकून राहील.  

जेवण बनवतांना गॅस सिलेंडर झाले लीक आग लागल्याने 4 जणांचा मृत्यू

'अनुपमा' अभिनेत्री रुपाली गांगुली भाजपमध्ये दाखल

महाराष्ट्र गीत : जय जय महाराष्ट्र माझा, गर्जा महाराष्ट्र माझा

मोदींकडून महाराष्ट्र दिनानिमित्त मराठीत शुभेच्छा!

टँकरच्या अपघातामुळे रस्त्यावर तेल सांडलेले पाहून मुख्यमंत्री शिंदे यांनी मदतीचा हात पुढे केला

आर्टरी ब्लॉकेज टाळतात हे 5 सुपरफूड, हृदयविकाराच्या जोखमीपासून तुमचे संरक्षण करेल

स्प्लिट एन्ड्ससाठी हे उपाय अवलंबवा

लाकडी फर्निचरची स्वच्छता घरात असलेल्या या 5 गोष्टींनी करा

लग्नाआधी पार्टनरला विचारून घेतल्या पाहिजे या गोष्टी

झोपण्यापूर्वी खाव्या मनुका, आरोग्याला मिळतील अनेक फायदे

पुढील लेख
Show comments