Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

किचनच्या चिमणीची स्वच्छता करण्यासाठी टिप्स

किचनच्या चिमणीची स्वच्छता करण्यासाठी टिप्स
, मंगळवार, 30 मार्च 2021 (18:21 IST)
आजच्या काळात मॉर्डन किचन मध्ये चिमणीची भूमिका महत्त्वाची आहे. चिमणी स्वयंपाकघरातील धूर शोषून घेते. या मुळे त्यात कचरा आणि घाण साचून जाते. चिमणी व्यवस्थितरित्या काम करावी यासाठी काही टिप्स सांगत आहोत. चला जाणून घ्या. 
 
कितीवेळा चिमणी स्वच्छ करावी -आपण घरात जास्त तेलकट पदार्थ जास्त वापरता तर चिमणी दर दोन महिन्याने स्वच्छ करा. अन्यथा दर तीन महिन्याने चिमणी स्वच्छ करा. 
 
चिमणी स्वच्छ करण्याची पद्धत - 
*डिशवॉशिंग लिक्विड- चिमणीचे फिल्टर काढून एका टबात गरम पाणी घालून बुडवून द्या. पाण्यात डिशवॉशिंग लिक्विड घालून चिमणीचे फिल्टर एक दोन तासासाठी भिजत ठेवा. नंतर स्क्रबरने धुऊन घ्या. 

* बेकिंग सोडा- गरम उकळत्या पाण्याने भरलेल्या टबमध्ये फिल्टर पूर्णपणे भिजत ठेवा.2-3 चमचे बेकिंग सोडा, 2-3 चमचे मीठ आणि दोन कप व्हिनेगर घाला. एक ते दोन तास सोडा. आपल्याकडे स्टीलचा मोठा कंटेनर असल्यास, या सर्व सामग्रीसह फिल्टर उकळवा.नंतर स्क्रबरने स्वच्छ करा. 
 
* पेंट थिनर- तेल आणि ग्रीस चे डाग काढण्यासाठी पेंट थिनर खूप प्रभावी आहे. आपण या जागी नेलपेंट थिनर किंवा रिमूव्हर देखील वापरू शकता.या साठी कपड्यावर थिनर घेऊन त्याने चिमणीचे फिल्टर स्क्रब करा. फिल्टर स्वच्छ केल्यावर धुवून उन्हात कोरडे करा. 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चविष्ट आलू जलेबी