Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

महिलांना रिलेशनशिपमध्ये काय हवं असतं?

Webdunia
मंगळवार, 11 सप्टेंबर 2018 (12:50 IST)
नातं म्हटलं की, प्रत्येकाच्याच वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहींना नात्यांमध्ये फार प्रोफेशनलपणा हवा असतो तर काहींना फार प्रेम हवं असतं. एकेकांना समजून घेणे हा कॉमन मुद्दा असतो. पण व्यक्तीनुसार या गोष्टी बदलतात. इतर महिलांच्या तुलनेत सक्षम महिलांचा रिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टिकोन फारच वेगळा असतो. त्यांना रिलेशनशिपमधून काय हवं असतं हे खालीलप्राणे सांगता येईल. 
 
त्यांना स्वातंत्र्य हवं असतं : सक्षम महिलांना नात्यात असताना किंवा प्रेमात असताना त्यांची ओळख गमवायची नसते. त्यांच्या पार्टनरने त्यांना बदलावं असं त्यांना वाटत नसतं. त्याऐवजी ती आहे तशी तिला स्वीकारावे असं त्यांना वाटत असतं. त्यांना त्यांच्या आवडी-निवडीसाठी वेळ द्यायचा असतो, मित्रमैत्रिणींना भेटायचं असतं, बाहेर जायचं असतं. त्यांना त्यांच्या पार्टनरला लाइफचं सेंटर करायचं नसतं. केवळ नात्यात अडकून पडायचं नसतं. पार्टनरलाच विश्व बनवायचं नसतं. 
 
पार्टनरने प्रामाणिक असावं : या महिला स्वतःही काही खोटं बोलत नाहीत. त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा असते की, त्यांच्या पार्टनरनेही प्रामाणिक राहावं. पार्टनरने याबाबत प्रामाणिक राहावे की, त्याला या रिलेशनशिपमधून काय हवंय. हे त्याला क्लिअर असावे नाही तर या नात्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. 
त्याने विश्र्वास ठेवावा : ती प्रामाणिक, विश्र्वासू आणि जबाबदार आहे. त्यामुळे तिला तिच्या पार्टनरने विश्र्वासू आणि प्रामाणिक असणे अपेक्षित असतं. तिला असं वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरला हे कळावं की, तिच्याकडे स्वतःचं लाइफ हॅन्डल करण्याची क्षमता आहे. 
 
पार्टनरचा वेळ हवा, गिफ्ट नकोत : अर्थातच महिलांना त्यांच्या पार्टनरने दिलेले गिफ्ट्‌स आवडतात. पण सक्षम महिलांना हेही माहीत असतं की, पार्टनरच्या वेळेला गिफ्ट हा पर्याय नाहीये. गिफ्ट देण्यापेक्षा तिला पार्टनरने सोबत असावं असं वाटत असतं. 
 
सन्मान हवा असतो : जर पार्टनरने तिला सन्मान दिला नाही किंवा तशी वागणूक दिली नाही तर याचा अर्थ त्याचं तिच्यावर प्रेमच नाही. हे तिला माहीत असतं त्यामुळे तिला वाटत पार्टनरने तिच्या विचारांचा, शरीराचा, आवडी-निवडीचा आणि मतांचा आदर करावा. 
 
खरी जवळीकता समजावी : सक्षम महिलांना हे माहीत असतं की, जवळीकता ही केवळ फिजिकल होणे नाहीये. ती एक भावना आहे, दोन विवस्त्र शरीरांचं शेअरिंग आहे आणि ते तितक्याच मोकळेपणाने मनाने हवं. हे त्याला कळावं हे त्यांना वाटत असतं. 
 
संवादाचं आणि ऐकून घेण्याचं महत्त्व समजावं : सक्षम महिला कधीही अडचणीकडे दुर्लक्ष करत नाहीत. त्यांना संवादाचं महत्त्व माहीत असतं, ऐकून घेण्याचं महत्त्व माहीत असतं. त्यांना हे माहीत असतं की, मोकळेपणाने, शांतपणे केलेल्या संवादाने रिलेशनशिप आणखी मजबूत होऊ शकते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ram Navami 2025 Recipe घरीच तयार करा आम्रखंड

प्रभू श्रीराम यांच्या जन्माचे ५ खरे पुरावे

बेडरूममधील या 3 चुकांमळे तुमचे वैवाहिक जीवन बिघडेल

कांदा खाल्ल्यानंतर तोंडाला दुर्गंधी येत असेल तर हे 10 सोपे उपाय करून पहा

बटाटे वाफवतांना कुकर काळे पडते? या सोप्या ट्रिक अवलंबवा

सर्व पहा

नवीन

Delicious healthy recipe पालक उत्तपम

या लोकांसाठी कुट्टूचे पीठ वरदान आहे, फायदे जाणून घ्या

बॅचलर ऑफ डेंटल सर्जरीमध्ये करिअर करा

ब्लॅकहेड्स काढून टाकण्याचे ७ सोपे उपाय जाणून घ्या

मधुमेहाचे रुग्ण केळी खाऊ शकतात का? जाणून घ्या माहिती

पुढील लेख
Show comments