Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

Relationship Tips:आपण योग्य जोडीदाराची निवड केली आहे का ? जाणून घ्या

Webdunia
शनिवार, 5 मार्च 2022 (23:05 IST)
जेव्हा आपण एखाद्यावर प्रेम करता किंवा त्याच्याशी नाते जोडता तेव्हा आपल्याला  त्याच्याबद्दल सर्व काही आवडते. नात्यात असल्याने आपण जोडीदाराच्या प्रत्येक चुकांकडे दुर्लक्ष करता आणि आपल्याला ज्या काही  गोष्टी आवडत नाहीत,  त्यांचा अवलंबही करू लागता, पण बदलत्या काळानुसार व्यक्तीही बदलते आणि त्याचे विचार ही बदलतात.

आपण जोडीदार म्हणून ज्याची निवड केली आहे. ती आपण  काही काळासाठी  आपली योग्य निवड समजू शकता, परंतु कालांतराने आपल्याला  हे जाणवू लागते की आपण ज्याची आपला जोडीदार म्हणून निवड केली आहे ते आपल्यासाठी योग्य जोडीदार नाही. आणि आपण एकमेकांसाठी बनलेलो नाही. आपण काही लहान गोष्टीमुळे आपण निवडलेला जोडीदार योग्य आहे किंवा नाही हे जाणून घ्या.
 
1 आदर न देणे- कोणत्याही नात्यात एकमेकांचा आदर करणे आवश्यक असते. जर आपला जोडीदार आपल्याला आदर देत नसेल तर तो जोडीदार म्हणून परिपूर्ण असू शकत नाही. जर आपला जोडीदार लग्नापूर्वी आपला आदर करत नसेल तर तो लग्नानंतरही आपल्याला आदर करणार नाही. 
 
2 सुरक्षेची काळजी न घेणे- ज्याच्यावर आपण प्रेम करता त्याच्या बद्दल काळजी वाटणे हे साहजिकच आहे.पण जर आपला  पार्टनर आपल्या सुरक्षेची काळजी करत नसेल किंवा आपण घेता तेवढी काळजी घेत नसेल तर भविष्यात आपल्याला या नात्यात निराशाच मिळेल.
 
3 राग - राग  करणं-  राग येणं ही एक  सामान्य गोष्ट आहे,पण जेव्हा आपला  जोडीदारा प्रत्येक गोष्टीत आपली  चूक काढत असेल आणि छोट्या-छोट्या गोष्टींवर आपला राग येत असेल, तेव्हा समजावं की त्याला आपल्या भावनांची काहीच  काळजी नाही. कदाचित आपला जोडीदार आपल्यावर प्रेम करत असेल पण त्यांच्यासोबत  संपूर्ण आयुष्य घालवणे आपल्यासाठी कठीण जाईल.
 
4 आपल्या मतांना महत्त्व न देणे-जर नात्यात दोन व्यक्ती असतील तर कोणत्याही परिस्थितीत दोघांच्या मताची  ही सहमती असणे आवश्यक आहे. जर तो आपल्या  मतांची पर्वा करत नसेल, आपल्या मताला, आवडी-निवडीला महत्त्व देत नसेल, तर तो जास्त काळ नात्यात राहू शकत नाही. या नात्यामुळे भविष्यात आपल्याला आपल्या निवडीबद्दल खेद वाटेल. 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

मार्गशीर्ष गुरुवारी महाविष्णूच्या पूजेचे महत्त्व आणि उपासनेची सोपी पद्धत जाणून घ्या

हे 3 गुण असलेल्या महिला भाग्यवान असतात, नवरा आणि सासरचे लोक नेहमी आनंदी राहतात !

घरात या 5 पक्ष्यांचे फोटो लावा, ज्ञान- समृद्धी वाढते, तिजोरी धनाने भरलेली राहते

आपले नाते कसे मजबूत करावे, 5 गोष्टी लक्षात ठेवा

त्वचेच्या कर्करोगाच्या संरक्षणासाठी हे उपाय खूप प्रभावी आहेत

सर्व पहा

नवीन

Amla During Periods मासिक पाळी दरम्यान आवळा खाऊ शकतो का? Amla पीरियड्सवर परिणाम करतो का?

पौष्टिक मेथीचे कटलेट रेसिपी

पीएचडी बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये करिअर करा

आलं पुरुषांसाठी किती फायदेशीर आहे?

जास्वंदापासून बनवलेल्या कंडिशनरने केसांना चमक आणा

पुढील लेख
Show comments