Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

इतकेच मला जाताना

Webdunia
इतकेच मला जाताना सरणावर कळले होते-
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते !
 
ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही,
मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते !
 
गेलेल्या आयुष्याचा मधुमास गडे विसरू या,
पाऊल कधी वाऱ्याचे माघारी वळले होते ?
 
मी ऐकवली तेव्हाही तुज माझी हीच कहाणी-
मी नाव तुझे तेव्हाही चुपचाप वगळले होते !
 
याचेच रडू आले की जमले न मला रडणेही
मी रंग तुझ्या स्वप्नांचे अश्रूंत मिसळले होते
 
नुसतीच तुझ्या स्मरणांची एकांती रिमझिम झाली-
नुसतेच तुझे हृदयाशी मी भास कवळले होते !
 
घर माझे शोधाया मी वाऱ्यावर वणवण केली-
जे दार खुले दिसले ते आधीच निखळले होते !
 
मी एकटाच त्या रात्री आशेने तेवत होतो-
मी विझलो तेव्हा सारे आकाश उजळले होते !
 
- सुरेश भट

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

प्रेरणादायी कथा : श्रावण बाळाची गोष्ट

Ratha Saptami 2025 रथी सप्तमी कधी? या दिवशी काय करावे

Golden Baba ६ कोटींचे सोने घालून फिरतात ६७ वर्षीय हे बाबा, प्रत्येक दागिन्याशी साधनेची एक कहाणी जोडलेली

Basant Panchami 2025 वसंत पंचमीला पिवळे वस्त्र का परिधान केले जातात?

सर्व पहा

नवीन

पौष्टिक मुळ्याचे कटलेट रेसिपी

हा रस खराब कोलेस्ट्रॉल मुळापासून काढून टाकेल! जाणून घ्या 5 उत्तम फायदे

देशी तुपापासून बनवलेल्या नैसर्गिक मॉइश्चरायझरने मिळवा चमकदार आणि सुंदर त्वचा

या लोकांना संधिवात होण्याचा सर्वाधिक धोका असतो! 5 महत्त्वाच्या टिप्स जाणून घ्या

उत्कटासन करण्याचे 6 फायदे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments