Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

छोरी….

Webdunia
रविवार, 6 जून 2021 (10:01 IST)
थबकुनी थोडी
वळुनी पुढे घाईनें
प्रौढ नि बुटक्या झाडाजवळुन जास्वंदीच्या
जाते वाट पुढे ही शाळेपाशी
 
शाळा:
चौकॊनी खॊकेच ४ खिडक्यांचे
रंग सफेद चुन्याचा
छप्पर लाल नळ्यांचे…
 
भल्या पहाटे (आठ वाजता)
झाडांचीही नसते जेंव्हा झोप संपली
सुरु व्हायची शाळा …….
पहिली घंटा….
दुसरी घंटा……..
सुरु प्रार्थना आणि नंतर:
“नमन तुला गणराया
बुद्धी जाग्रुती देई मुलां या”
….एक जांभई.
 
कर्कष्य आवाजाने नंतर हुकुम व्हायचा:
“काढा पाट्या
कुठे उजळणी
चला दाखवा…..”
 
…माझी पाटी कोरी…
हात पुढे….
भिंगे खवचट चष्म्याची रोखुनिया बघती
वेत सपासप माझ्या हातांवरती…
 
किती वेळ रडलो नाही ठाऊक
आली अवचीत जाग स्पर्शता हात मऊ
मी पाहिले शेजारी;
 
नविन कोणी मुलगी
केस भुरे सोनेरी
निळसर डोळे…….
 
मी विचारले तिज, “नांव काय तुझे….”
ती खट्याळ हसली आणि म्हणाली
“नांव? छोरी ….हात पुढे कर.”
आणि नजर खॊडकर
आणिक माझ्या हातावरती …दुखर्या हातावरती .
चिमणिच्या नाजुक दातांनी तोडियली
फोड एक कैरीची….
 
फोड एक कैरीची;
अजुन ताजी
जिभेवर जिची आंबट गोडी,
भुरभुरती सोनेरी कुंतल,
 
अजुन घेते टिपुनी वेदना
नजर तिची ती निळी खॊडकर…..
गिरकी घेते मनीं कलाबुत तिच्या स्वरांची;
“नांव? छोरी…. हात पुढे कर”
 
– मंगेश पाडगांवकर
 
 

संबंधित माहिती

दादरच्या शिवाजी पार्क मैदानावर महायुतीची प्रचारसभा,राज ठाकरे, पंतप्रधान नरेंद्र मोदी एकत्र एकाच मंचावर

पिंपरी-चिंचवडमध्ये पुन्हा होर्डिंग कोसळले, सुदैवाने जीवित हानी नाही

सात्विक-चिराग जोडीने उपांत्यपूर्व फेरीत स्थान मिळवले

Russia-China: रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी घेतली शी जिनपिंग यांची भेट

SRH vs GT : पावसामुळे सनरायझर्स हैदराबादला प्लेऑफमध्ये

एमबीए मास्टर इन कंप्यूटर मैनेजमेंट मध्ये करिअर करा

वजन कमी करण्यासाठी तसेच त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर आहे शेवगा

पुरुषांसाठी या बिया खूप फायदेशीर, शुक्राणूंची संख्या झपाट्याने वाढवतात, खाण्याची योग्य पद्धत

Covishield नंतर आता Covaxin चे साइड इफेक्ट्स समोर आले, तरुण मुलींवर अधिक प्रभाव!

रक्त लाल असून रक्तवाहिन्या निळ्या का दिसतात

पुढील लेख
Show comments