rashifal-2026

वाढदिवसाचा आंनद

Webdunia
मंगळवार, 29 सप्टेंबर 2020 (13:10 IST)
वाढदिवसाचा आंनद की काय समजे न मला,
एक दिवसांनी मोठे झालो, ही जाणीव मनाला,
मागे सरत गेलं आयुष्य, खूप दूर निघून,
काही निसटतय का काही बरं आपल्या हातून?
समजतंय पुन्हा मागचा क्षण येणे नाही फिरून,
घुसमट होतेय मनाची, तोच विचार करून करून,
आता कितीसा वेळ ठेवलाय देवांन आपुल्या साठी,
अजून किती जुळणार, ऋणानू बंधाच्या गाठी,
किती स्वप्नं होणार पूर्ण, आणि किती राहील अधुरे,
सुटतील का आयुष्यातील अनुत्तरीत सारे,
असो काहीही असलं तर एक मात्र सत्य हेच,
एक वर्ष वाढलं आपलं, वेचायच ते वेच !
.....अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल २५ ते ३१ जानेवारी २०२६

गणपतीची आरती सुखकर्ता दुःखहर्ता Sukhkarta Dukhharta

हिवाळ्यात दररोज रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारा हा चहा प्या; लिहून घ्या रेसिपी

हिवाळ्यात पनीर का खावे? आरोग्यासाठी काय फायदे आहे, जाणून घ्या

27 वर्षांनंतर शनीचे नक्षत्र परिवर्तन : 17 मे पर्यंत कोणत्या राशींना होणार मोठे लाभ आणि कोणाला होणार नुकसान?

सर्व पहा

नवीन

मानसिक शांतीसाठी हे 3 योगासन करा

प्रेरणादायी कथा : स्वतःवर विश्वास ठेवा

विनोदी कथा.. कावळ्यांचे अख्खे खानदान पिंडावर तुटून पडले

अस्सल कोल्हापुरी तांबडा-पांढरा रस्सा; हॉटेलसारखी चव मिळवण्यासाठी वापरा ही 'सीक्रेट' टीप

लग्नापूर्वी जोडीदाराला 'हे' ४ प्रश्न नक्की विचारा; कधीच पश्चात्ताप होणार नाही

पुढील लेख
Show comments