rashifal-2026

माणूस आणि देव

Webdunia
गुरूवार, 14 जानेवारी 2021 (13:39 IST)
माणसाला हवा सदा आनंद 
पण देवाला देतो काही सेकंद..!
विषयांमध्ये जातो गढून..
देवाची आठवण अधून-मधून !
प्रपंच करतो आवडीने 
परमार्थ मात्र सवडीने..
नाही पूजा..नाही ध्यान.. 
मोबाईलशी अनुसंधान! 
 
नामस्मरण boring फार 
त्याने काय होणार यार?? 
देवाने करावी कृपा 'खास' 
गप्पा मारतो तासंतास ! 
जप करतो माळेवर 
पण खरे प्रेम पैशावर ! 
 
खिचडीसाठी करतो उपास ! 
भक्तीमध्ये पूर्ण नापास.. 
स्वतःच्या पानात वाटयांची दाटी!
नैवेद्याला छोटी वाटी .. 
 
संकट आल्यावर देव आठवतो
नवस बोलून deal करतो ! 
अभिषेक मोठ्या थाटात करतो 
return वरती डोळा असतो !
 
सर्व करतो स्वतःसाठी 
पण देव हवा सदा पाठी ! 
देवाकडं सारख मागणं 
माणसा तुझं काय हे वागणं ??
 
शक्ती दे, युक्ती दे, बुद्धी दे, विद्या दे
नोकरी दे, घर दे, बायको दे, मुलं दे
सुख दे, समाधान दे, यश दे, कीर्ती दे 
आणि हे सारं कायम टिकू दे 
असाही देवा वर दे ! 
 
हसून देव म्हणतो,
"माणसा, 
थकलो तुला देऊन सारखा 
मागण्या मागतोस फारच मस्त
पण एवढा मी नाही स्वस्त ! 
 
मागून मागून थकत नाहीस 
थँक्यू सुद्धा म्हणत नाहीस !
भक्तीमध्ये करतोस लबाडी 
अरे चाललीये कुठे तुझी गाडी!!
 
एवढं सगळं द्यायचं म्हणतोस !
पण माझ्यासाठी काय करतोस?? 
थोडीफार आठवण काढून 
मलाच तुझी सेवा सांगतोस..!
 
अरे एकदा तरी म्हण राजा, 
देवा मला भक्ती दे 
मनी तुझे प्रेम दे
पायी तुझ्या मुक्ती दे..
 
तुझे गीत गाण्यासाठी 
कंठामध्ये सूर दे 
तुझे रूप बघण्यासाठी 
डोळ्यांमध्ये भूक दे
 
तुझा महिमा ऐकण्याची 
कानांना या आस दे 
तुझे नाम घेण्यासाठी माझा प्रत्येक श्वास दे. .! 
 
सुटो माझी आसक्ती,
लाभो मला विरक्ती
अंतकाळ साधण्याइतके
नामामध्ये प्रेम दे "
अंतकाळ साधण्याइतके
नामामध्ये प्रेम दे...

- सोशल मीडिया

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

मराठी महिन्यांची नावे आणि संपूर्ण माहिती Marathi Month Name

Makar Sankranti Special Tilgul Poli Recipe मकर संक्रांतीला चटकन तयार करा गुळाची पोळी

Gazar Halwa Recipe : या सोप्या पद्धतीने घरीच बनवा गाजर हलवा

तुमचा पाळीव प्राणी आजारी आहे का? 5 लक्षणे बघून जाणून घ्या

बीटेक इन इंफॉर्मेशन साइंस अँड इंजीनियरिंग मध्ये करिअर बनवा

पुढील लेख
Show comments