तात्वीक भांडण सर्वांशी होते, पण "शत्रुत्व" कुणाशीचं ठेवू नये!
खरं तर मतभेद एकमेकांशी असू शकतात, जरूर असावेत,
पण मनांत कायम "भेद" ठेवू नये.
एखाद्याशी वाद घालावा,
पण वादावादी न करता क्षणात "सुसंवाद" साधवा.
"अहंकार" हाच या सर्वांचं मुळ आहे,
तो विनाकारण "बाळगुन जगू" नये.
शेवटी "मृत्यू" हे "सुंदर, शाश्वत वास्तव" आहे,
त्याचे "स्मरण" असावे भय नसावे.
आपण जन्माला आलोय
ते गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही
तर ऊरलेल्या दिवसांचा "आनंद " उपभोग घेण्यासाठी
याचे "स्मरण" ठेवू या.
आपण किती आनंदात आहोत त्यापेक्षा आपल्यामुळे किती "जण आनंदात" आहेत याला खूप महत्व आहे.
"एक हृदय" घेऊन आलोय जाताना "लाखो हृदयात" जागा करुन जाता आलं पाहिजे!
क्षमा करा, प्रेम द्या, प्रेम घ्या!