rashifal-2026

।सुर्याभाऊ निघाले बाजारात।

Webdunia
सोमवार, 17 ऑगस्ट 2020 (11:54 IST)
काही न काही विकून खळगी पोटाची भरायची
आज आला सूर्य टोपलीत,तयारी विकून टाकायची! 
 
निघाले बिगिबिगी, हाती धरलं पोराला!
लवकरच गाठायचं होतं मला बाजाराला!  
 
वाटेत लागलं देऊळ हात जोडले त्याला,
भेटला का गं देव?त्याने पुसलं मला! 
 
मी मानेन चं म्हटलं त्याला
नाही गं बाई !
तो म्हणाला जो दिसतोय त्यालाच विकायची तुला घाई! 
 
बाकी तर देव दिसत बी नाही गं माय 
कशाला विकते ह्याला, निदान दिसून भलं तर करतो हाय! 
 
पटलं मला पोराचं म्हणणं,
दिला सूर्याला सोडून,
तो ही गेला पटकन परत,
दिलं चांदोबा ला धाडून!  
 
अश्विनी थत्ते

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

साप्ताहिक राशिफल 28 ते 3 जानेवारी 2025

घरात पैसा टिकत नाही? बाथरूमशी संबंधित या ४ चुका कारण असू शकतात, नक्की टाळा

जोडीदाराला भावनिकदृष्ट्या जोडण्यासाठी 6 ट्रिक्स, तुमचे नाते पूर्वीपेक्षा 10 पटीने खोल होईल

असितकृतं शिवस्तोत्रम् Asitakrutam Shivastotram

मारुती स्तोत्र : भीमरूपी महारुद्रा । वज्रहनुमान मारुती ।

सर्व पहा

नवीन

लहान मुलांसाठी १० हेल्दी स्नॅक्स: पौष्टिक आणि मुलांना आवडतील असे पदार्थ

हिवाळ्यात प्रतिकारशक्ती मजबूत करण्यासाठी या सवयी बदला

बॅचलर ऑफ टेक्नॉलॉजी (बीटेक) इन सेफ्टी अँड फायर इंजिनिअरिंग करून करिअर बनवा

केसगळतीचा त्रास रोखण्यासाठी पेरूच्या पानांचा वापर करा

मराठी महिन्यांची नावे आणि संपूर्ण माहिती Marathi Month Name

पुढील लेख
Show comments