Festival Posters

तुझं गुपित

Webdunia
शनिवार, 24 डिसेंबर 2022 (08:30 IST)
मैतरणी ग सांग साजणी गुपीत समदं मला
कशाचा ध्यास तुला लागला?
 
झुंजुरकाचं काखंवरती घेऊनिया घागर
एकली जातिस ओढ्यावर!
गुरं वासरं पार पिटाळुन वरल्या माळाकडं
झटकशी उन्हांत कोणाकडं?
 
शिरवाळीचं ओघळीतल्या निवत्या वाळूवर
बांधिशी कुणासंगाती घर?
कां घुटमळशी ग कडुसं
 
पडल्यावर? 
कां अल्याड चुकती रानिं तुझी वासरं?
 
ती रोजच घुमते शीळ कुणाची बरं?
करंजाखालीं कोण भेटतौ शमलेवाला तुला?
कशाचा ध्यास तुला लागला?
 
पिंपरणीचीं कवळीं पानं उन्हात व्हावीं तशी
कशानं मलूल झालिस अशी?
गालांवरती रसरस करिती मुरमाच्या पुटकुळ्या
चुरडल्या ओठांच्या पाकळ्या
 
कशी विरलि ग नवीन चोळी बाई छातीवर
पिचकले हातांतील बिलवर?
 
घे उरकुन आतां लौकर साखरपुडा
ह्यो खुळ्या पिरतीचा रस्ता लइ वांकडा
ह्यो लागो परता बोल तुला वावडा
पिकल्या आंब्यावरचा राघू चुकवुन जाईल तुला
द्वाड ह्यो इष्काचा मामला?
 
- ग. दि. माडगूळकर (गदिमा)

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मासात मुलीने आईची ओटी का भरावी? जाणून घ्या धार्मिक कारण

Adhik Maas 2026 Upay अधिक मासात ३३ दिवे लावण्यामागील रहस्य: ३३ कोटी देवतांचा आशीर्वाद प्राप्त करा

तणाव व्यवस्थापन करण्यासाठी जीवनशैलीत हे बदल करा

इयत्ता ११वीत विज्ञान, वाणिज्य की कला तुमच्यासाठी कोणती शाखा सर्वोत्तम आहे जाणून घ्या

रेशमी साडी खरेदी करताना फसवणुकीला बळी पडू नका, अशी तपासा

सर्व पहा

नवीन

घरीच बनवा अगदी हॉटेलसारखी क्रीमी आणि किंचित गोड मेथी मटर मलाई रेसिपी

जलद श्वासोच्छ्वास आणि हृदयाचे ठोके वाढणे एंग्जायटीची लक्षणे आहे, इतर लक्षणे जाणून घ्या

SBI Recruitment :एसबीआयने 800 हून अधिक पदांसाठी भरती जाहीर केली, संपूर्ण तपशील जाणून घ्या

केसांच्या समस्येवर कांद्याचे पाणी उकळून लावण्याचे फायदे जाणून घ्या

उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा झटका येऊ शकतो दुर्लक्षित करू नका

पुढील लेख
Show comments