Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

चहा चे डाग, कापडं, फर्निचर, कप इत्यादी पासून काढण्यासाठी या युक्त्या अवलंबवा

चहा चे डाग, कापडं, फर्निचर, कप इत्यादी पासून काढण्यासाठी  या युक्त्या अवलंबवा
, सोमवार, 18 जानेवारी 2021 (19:30 IST)
हिवाळ्यात गरम चहा मिळणं, स्वर्ग मिळण्याच्या आनंदा सारखा आहे.हे पिण्याने परम आनंदाची प्राप्ती होते. पण बऱ्याच वेळा आपण गोष्टींमध्ये एवढे गुंग असतो की चहा कधी सांडतो कळतच नाही. चहाचे डाग हट्टी डागांपैकी एक असतात. हे कपड्यांना लवकर खराब करतात आणि बऱ्याच दिवसांपर्यंत निघत नाही.तसेच क्रॉकरी मधून देखील निघत नाही परंतु हे डाग काढणे अशक्य नाही.काही गोष्टींचा वापर करून हे डाग सहजपणे काढू शकतो चला तर मग जाणून घेऊ या की कोणत्या गोष्टींचा वापर करावा. 
 
1 बेकिंग सोडा- 
बऱ्याच वेळा फिकट रंगाच्या सुंदर कपांमध्ये चहाचे डाग लागतात जे वारंवार स्वच्छ केल्यावर देखील निघत नाही. अशा मध्ये अस्वस्थ ना होता बेकिंग सोड्याचा वापर करा. ह्याचा वापर करून आपण कपावर लागलेले चहाचे हट्टी डाग सहजरित्या घालवू शकता. कपड्यांना बेकिंग सोड्याच्या घोळात घाला आणि त्याने कप स्वच्छ करा. कप नवीन सारखे दिसू लागतील.
 
 2 बियर- 
चहा खडबडीत कपड्यावर पडल्यावर त्याला काढणे खूप अवघड होतात. हिवाळ्यात आपण ब्लॅंकेट मध्ये बसून चहा पीत असताना चहा सांडल्यावर त्यावरून डाग काढणे अवघड होतात. अशा परिस्थितीत बियर आपली मदत करते. बियरचा वापर करून कपड्यांवरील डाग सहजपणे काढले जाऊ शकतात. या साठी  बियर मध्ये एक कापड बुडवून घ्या आणि त्याला चहाच्या डागावर चोळा. डाग पूर्णपणे नाहीसे होतात. 
 
3 लिक्विड हँडवॉश -
फर्निचरवर चहाचे डाग लागले असतील तर त्याला लिक्विड हँडवॉशने सहजपणे काढू शकतो. दोन कप गरम पाण्यात एक चमचा लिक्विड हँडवॉश आणि एक चमचा व्हिनेगर मिसळा.हे मिश्रण फर्निचर वरील डागांवर स्क्रबर किंवा कपड्यांच्या साहाय्याने लावा आणि तो पर्यंत स्वच्छ करत राहा जो पर्यंत डाग स्वच्छ होत नाही आणि फर्निचर पूर्वीसारखे दिसत नाही.
 
4 मीठ -
एकाच कपात बऱ्याच काळ चहा प्यायल्याने त्यामध्ये एक वर्तुळ बनतो, जे साधारण डिशवॉश ने स्वच्छ केल्यावर देखील स्वच्छ होत नाही. अशा परिस्थितीत लोकांना नवीन कप आणावे लागतात. परंतु आपल्याला तेच कप वापरण्याची इच्छा असल्यास हे वर्तुळे काढून टाकण्यासाठी मीठ वापरा. मीठ घालून कपड्याने घासल्याने सहजपणे वर्तुळ काढता येतात.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

जेवण्यातच नव्हे, तर कांद्याचे इतर 5 फायदे जाणून घ्या