Dharma Sangrah

अविवाहित राहणे योग्य किंवा नाही ..

Webdunia
गुरूवार, 1 एप्रिल 2021 (09:40 IST)
एक काळ असा होता की मुलगा आणि मुलगी एकमेकांना भेटणे तर फार दूर ते आपसात बोलत देखील नव्हते आणि त्यांचे लग्न कुटुंबाच्या संमतीने लावून द्यायचे .पण आता काळ बदलला आहे आणि मुलगा आणि मुलगी एकमेकांना पसंत करतात त्यानंतरच लग्न करण्याचा निर्णय घेतात. पण जगभरात अविवाहित राहण्याचा ट्रेंडही वाढत आहे. लोक लग्न टाळत असल्याचे दिसून येत आहे, कारण अविवाहित राहून ते सुखी आयुष्य जगू शकतात असे त्यांना वाटते.चला तर याचे फायदे आणि तोटे जाणून घेऊ या. 
 
* अधिक आनंदी जीवन जगतात- विवाहित लोकांसह ही समस्या असते की त्यांना कुटुंबाला घेऊन चालावे लागते. परंतु अविवाहित लोकांसह ही समस्या नसते. त्यांच्या वर कोणतीही जबाबदारी नसल्यामुळे ते सुखी आणि आनंदी जगतात. काही अविवाहित लोकांना एकाकीपणा जाणवतो त्यामुळे ते दुखी होतात. 
 
*  पैसे वाचवतात- विवाहित लोकांचे खर्च खूप असतात .त्यामुळे त्यांना पैशाची चणचण सहन करावी लागते. अविवाहित लोकांसह ही समस्या नसते ते स्वतःचा पैसा स्वतःवरच खर्च करतात. 
 
* तंदुरुस्त राहतात- अविवाहितांकडे स्वतः कडे लक्ष देण्यासाठी भरपूर वेळ असतो त्यामुळे ते तंदुरुस्त राहतात आणि आजारी कमी पडतात. परंतु जेव्हा अविवाहित लोक आजारी होतात तेव्हा त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांच्या जवळ कोणीच नसत.त्या मुळे त्यांना अनेक समस्यांना सामोरी जावं लागत. 
 
* करिअर वर लक्ष देऊ शकतात- अविवाहित लोक एकटे असल्यामुळे आपल्या करिअर कडे चांगले लक्ष केंद्रित करू शकतात आणि पुढे वाढतात. ह्याचा अर्थ असा नाही की विवाहित लोक करिअरमध्ये प्रगती करत नाही. ते आपल्या क्षमतेनुसार पुढे वाढतात. 
 
 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Christmas 2025 Gift Ideas नाताळनिमित्त मित्रांसाठी काही खास गिफ्ट आयडियाज

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला हे 9 फायदे मिळतात

बोर्ड परीक्षेत हस्ताक्षर सुधारण्यासाठी आणि पूर्ण गुण मिळविण्यासाठी 5 सर्वोत्तम टिप्स जाणून घ्या

हिवाळ्यात तुमचा चेहरा काळवंडतोय का ? कारणे आणि उपाय जाणून घ्या

Health Benefits of Roasted Potatoes : भाजलेले बटाटे खाल्ल्याने आरोग्याला हे 6 आरोग्यदायी फायदे मिळतात

सर्व पहा

नवीन

थ्रेडींग करवताना कमी वेदना होण्यासाठी या टिप्स अवलंबवा

World Meditation Day 2025: ध्यान म्हणजे काय, ते कसे सुरू करावे? त्याचे महत्त्व जाणून घ्या

21 डिसेंबर हा वर्षातील सर्वात लहान दिवस आहे, जाणून घ्या 5 मनोरंजक तथ्ये

हिरव्या मटारपासून बनवा झटपट दोन स्वादिष्ट पाककृती

घाईघाईने खाण्यामुळे आरोग्याला धोका होऊ शकतो, कसे काय जाणून घ्या

पुढील लेख
Show comments