Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

रोज ऑफिसला जातांना पर्स मध्ये ठेवा ह्या वस्तू

Webdunia
बुधवार, 6 मार्च 2024 (19:30 IST)
आजच्या काळात वर्किंग वुमन असणे काळाची गरज आहे. महिला सशक्तिकरणसाठी महिलांनी काम करणे गरजचे आहे. तसेच अनेक ऑफिस महिलांना सुरक्षित वातावरण प्रदान करतात. ज्यामुळे महिला निश्चिंत होऊन काम करू शकतात. ऑफिस जीवनशैली ही खूप व्यस्त असते. ज्यामुळे तुम्ही अनेक वस्तू घरी विसरुन जातात. ऑफिसमध्ये आपल्याला अनेक वस्तूंची गरज भासते.  ज्यांचे आपल्याला कधीही काम पडू शकते. जर तुम्ही देखील वर्किंग वुमन असाल तर तुम्हाला तुमच्या पर्स मध्ये या वस्तू ठेवणे गरजेचे असते. चला जाणून घेऊ या  कोणत्या आहेत त्या वस्तू . 
 
चार्जर आणि हेडफोन- वर्तमानकाळात मोबाईल शिवाय रहाणे अशक्य आहे. मोबाईल देखील काळाची गरज बनली आहे. जर तुम्ही वर्किंग वुमन असाल तर तुमचे जास्त काम हे मोबाईलवरच होतात. फोन जास्त वापरल्यामुळे तो लागलीच डिस्चार्ज होतो. म्हणून तुम्ही तुमच्या पर्स मध्ये चार्जर जरूर ठेवावे. तसेच हेडफोन ऑफिस मध्ये सोबत नेणे गरजेचे असते. तुम्ही काम करतांना स्पीकर किंवा ऑडियो ऐकू शकत नाही या करिता हेडफोन असणे गरजेचे आहे. 
 
सेनेटरी पॅड- तुमचे पीरियड्स असो किंवा नासोत पण नेहमी सोबत आपल्या पर्स मध्ये सेनेटरी पॅड नक्कीच ठेवावे. महिलांची डेट कधी लवकर किंवा अचानक पण येते. तसेच ऑफिसमध्ये कोणत्याही महिलेला सेनेटरी पॅडची गरज पडू शकते. म्हणून तुमच्या पर्स मध्ये नेहमी सेनेटरी पॅड ठेवावे. 
 
कॅश असावी- आजच्या काळात अनेक लोक ऑनलाइन पेमेंट करतात. पण काही वेळेस तुम्हाला कॅशची गरज पडू शकते. काही वेळेस ऑनलाइन पेमेंट होत नाही. तसेच इंटरनेट हळू होणे किंवा मोबाईल डिस्चार्ज झाल्यामुळे तुम्ही ऑनलाइन पेमेंट करू शकत नाही. या करिता  पर्स मध्ये 500 पर्यन्त कॅश नक्की ठेवावी. 
 
रुमाल किंवा वाइप्स- ऑफिसच्या धावपळीत आपला चेहरा तेलकट होतो म्हणून काही वेळेस तुम्हाला रुमाल किंवा वाइपची गरज पडू शकते. म्हणून पर्स मध्ये नेहमी रुमाल किंवा वाइप पॅकेट ठेवावे. तसेच तुम्ही टिशु देखील ठेऊ शकतात  
 
पेन और नोटपॅड- आजची टेक्नोलॉजी मध्ये आपण पेन आणि डायरी ठेवणे पसंद करत नाही. पण ऑफिसला जातांना तुमच्या जवळ पेन आणि डायरी असणे आवश्यक असते. ऑफिस मीटिंग मध्ये तुम्ही फोनवर महत्वाची बातमी नोट करू शकत नाही. तसेच काम करतांना तुम्हाला पेन आणि डायरीची गरज भासु शकते. म्हणून पेन आणि डायरी तुमच्या पर्स मध्ये ठेवा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे. या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Winter Special Recipe: गाजर हलवा

व्यावसायिक पायलट होण्यासाठी प्रक्रिया जाणून घ्या

या फळात आहे पुरुषांच्या 5 समस्यांवर उपाय, जाणून घ्या

पेट्रोलियम जेलीचे फायदे जाणून घ्या

पंचतंत्र कहाणी : विश्वासघाताचे फळ

पुढील लेख
Show comments