rashifal-2026

पावसात चिंब फुटबॉल

रुपाली बर्वे
उन्हाळ्यानंतर पहिल्यांदाच एवढा पाऊस पडत होता की मन मोरासारखे पीस पसरवून नाचावे असे होऊ लागले होते तिला...खिडकीतून पाऊस बघत तिने आवाज दिला मन्या चलतोस का? काहीच उत्तर मिळाले नाही..
 
ती पुन्हा अजून जोरात बोलली... चलतोस का रे? पुन्हा उत्तर नाहीच... वळून बघते तर मन्या मोबाइलमध्ये डोकं खुपसून डोळे फोडत बसला होता... मोबाइलने जणू डोळे, कानासकट मेंदूची अगदी वाट लावली होती...
 
आईने एक क्षणही विचार न करता दारं उघडलं आणि अंगणात जाऊन दोन्ही हात पसरवून उभी झाली. धो धो पाऊस अंगावर पडू लागलं आणि आत्मा तृप्त होत होती. तेवढ्यात हे काय तर फुटबॉलचा आवाज येऊ लागला.... मन्याचं लक्ष वेधलं गेलं. फुटबॉल वर केवढा जीव होता त्याचा.. किती हठ्ठ केल्यावर वडिलांनी दहाव्या वाढदिवसाला आणून दिला होता...आता फुटबॉल आवाज ऐकताक्षणी बाहेर नजर पडली तर आई पूर्ण भिजलेली आणि हातात फुटबॉल आणि तिची हास्य स्मित आणि हसरे डोळे मन्या जणू पहिल्यांदाच बघत होता. नाही तर घरात किंवा अंगणात फुटबॉलचा आवाज जरी केला तरी चिडायची... जा ग्राउंडवर जाऊन खेळ...
 
मन्या लगेच उठला आणि आईच्या डोळ्यांच्या इशारा बघत पावसात पहिलं पाऊल टाकलं आणि लगेच पुन्हा  दोन पाऊल मागे सरकला...आई तू... हे म्हणे पर्यंत आईने त्याला खेचले आणि फुटबॉल त्याकडे सरकवला...मग काय दोघांनी धमाल केली... मोबाइल की हे निसर्गात खेळणे यातून काय सुंदर हे मन्याने ठरवले होते...

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

भारतीय समाजात घटस्फोटाचे प्रमाण का वाढते आहे? नाते वाचवण्यासाठी काही सोपे प्रयत्न

Lohri 2026 Special Dishes लोहरी विशेष बनवले जाणारे खास पदार्थ

Lohri Wishes in Marathi 2026 लोहरीच्या शुभेच्छा मराठीत

Sankranti Bhogi 2026 अस्सल मराठमोळी भोगीची संपूर्ण थाळी

वजन कमी करण्यासाठी अंजीरचे फायदे, दररोज किती खावे जाणून घ्या

पुढील लेख
Show comments