Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

ऑनलाइन खरेदी करा पण या चुका मात्र टाळा

Webdunia
आजच्या आधुनिक जगात, घरी बसून खरेदी करणे एक फॅशन बनले आहेत. घरी बसल्या-बसल्या आपण ऑनलाइन ऑर्डर करतो, पेमेंट देखील ऑनलाइन केले जातात आणि खरेदी केलेले प्रॉडक्ट देखील आपल्याला घरी बसल्या मिळून जातं. या फेस्टिव्हल सीझनमध्ये तर ई-कॉमर्स कंपन्या ग्राहकांना मोठ्या ऑफर देखील देत आहे. कॅश बँक सारख्या ऑफर बऱ्याच उत्पादनांवर चालत आहे. पण ऑनलाइन शॉपिंगमध्ये फसवणूक आणि लबाडीची भयानक घटना देखील बाहेर येत आहेत. अशामध्ये आपण निश्चितच सावधगिरी बाळगली पाहिजे. 
 
नुकत्याच महाराष्ट्रातही अशीच एक घटना घडली आहे. येथे एका व्यक्तीने ऑनलाइन खरेदी करून मोबाईल विकत घेतला, पण जेव्हा पॅकेट उघडले तर त्यात मोबाइलऐवजी वीट सापडली. या व्यक्तीने मोबाइलसाठी 9134 रुपये दिले होते. अशातली ही पहिली घटना नाही, यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहे. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना काही गोष्टींवर लक्ष देणे आवश्यक आहे.
 
या गोष्टी लक्षात ठेवा:
 
1. जेव्हाही आपले उत्पादन घरी येते तेव्हा मोबाइलवरून त्याचे पॅकिंग उघडताना व्हिडिओ किंवा फोटो तयार करा जेणेकरून तक्रार करण्याची वेळ आलीच तर आपल्याकडे पुरावा असेल.
2. आपण ऑर्डर केलेल्या वस्तूंच्या जागी दुसरी वस्तू देखील मिळाली तर कंपनीच्या ग्राहक सेवा किंवा पोलिस स्टेशनात याबद्दल त्वरित तक्रार करा.
3. अनेक कंपन्या सीओडी अर्थात कॅश ऑन डिलिव्हरी अश्या ऑफर देतात. सोयीच असल्यास अश्या प्रकारे भुगतान करणे कधीही योग्य ठरेल.
4. कोणत्याही ऑनलाइन पोर्टलवर खरेदी करण्यापूर्वी आपण इतर कोणत्याही लिंकवर क्लिक करत तर नाहीये याची काळजी घ्या कारण असे झाल्यास नको ते नोटिफिकेशन किंवा ईमेलने आपला इनबॉक्स भरत असतो.
5. ऑनलाइन खरेदी करताना दर वेळी एकच कार्ड वापरा. अशाने अकाउंट चॅक करताना गोंधळ होण्याची शक्यता कमी असते.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

पत्नी अजूनही तिच्या माजी प्रियकरावर प्रेम करत असेल तर काय करावे?

दररोज कमी पाणी पिण्याची सवय मुतखड्याचा धोका वाढवू शकते

वॅक्सिंग करताना या टिप्स अवलंबवा

मकर संक्रांतीला मासिक पाळी आल्यावर काय करावे

२०२६ मध्ये या ४ राशींचे भाग्य पूर्णपणे बदलेल, तुम्ही तयार आहात का?

सर्व पहा

नवीन

वारंवार सर्दी आणि खोकला होतोय? कारणे आणि प्रतिबंधात्मक उपाय जाणून घ्या

सण आला हा संक्रांतीचा कविता

मकर संक्रांति रेसिपी तिळाची चविष्ट चिकी बनवा ,सोपी रेसिपी जाणून घ्या

Makar Sankranti Recipes मकर संक्रांतीला बनवले जाणारे काही खास पदार्थ

Makar Sankranti 2026 Wishes in Marathi मकर संक्रांतीच्या शुभेच्छा मराठी

पुढील लेख
Show comments