Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

शॉपिंग करताना पैसे वाचवायचे असल्यास हे करा

Webdunia
मंगळवार, 24 नोव्हेंबर 2020 (14:25 IST)
शॉपिंग किंवा खरेदारी करणं कोणाला आवडत नाही. असं बऱ्याचवेळा घडत की लोक खरेदारीला गेल्यावर आपल्या निर्धारित बजेटपेक्षा अधिकच खर्च करतात, ज्या मुळे त्यांच्या बजेटवर विपरीत परिणाम होतो. अशा परिस्थितीत महिन्याचे व्यवस्थापन करणे त्यांच्यासाठी हे मोठे आणि अवघड काम असतं. आम्ही हे टाळण्यासाठी काही अशा टिप्स आणल्या आहेत ज्यांना अवलंबवून आपल्याला काही मदत होईल. 
 
* एक यादी तयार करा - 
सर्वप्रथम आपल्याला काय घ्यायचे आहे त्याची एक यादी तयार करा. यादी केवळ वाण्याकडील किराण्याचे सामान आणण्यासाठीच नव्हे तर इतर खरेदीसाठी देखील केली जाऊ शकते. आपल्याला कपड्याची खरेदी करावयाची असल्यास तरी ही. आपल्याला करावयाचे इतकेच आहे की आपल्या कपड्यांवर एक दृष्टी टाकायची आहे आणि यादीत लिहून काढायचे आहे की आपल्याकडे कोणत्या प्रकारचे कपडे नाही. किंवा आपल्याला कोणत्या प्रकारचे कपडे खरेदी करणं आवश्यक आहे. असं केल्याने अनावश्यक खर्च होण्यापासून टाळता येऊ शकतं.
 
* फक्त रोख रक्कम बाळगा - 
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढतच आहे. त्यामुळे लोकांचा कल रोख रकमे पेक्षा डिजीटल पेमेंटच्या दिशेने वाढत चालला आहे. आणि आपण रोख रक्कम घेऊन चाललो आहोत ? होय, आपल्या बजेटमध्ये खरेदी करण्यापेक्षा इतर दुसरा कोणताही योग्य मार्ग नाही. जेव्हा आपल्या पाकिटात खर्च करण्यासाठी अतिरिक्त पैसे नसल्यास, आपण इतर गोष्टींवर पैसे कसे काय खर्च करू शकता आणि हे आपल्याला अनावश्यक खर्च करण्यापासून वाचवेल सुद्धा.
 
* एकाच ठिकाणी थांबू नका -
एकाच ठिकाणी अडकू नये. मग ते किराणाच्या सामान घेण्याची खरेदी असो किंवा कपडे खरेदी करण्यासाठी असो. एकच ठिकाणी थांबायचे नाही. याच वस्तू आपण दुसऱ्या ठिकाणी देखील बघू शकता. उदाहरणार्थ आपल्या आवडत्या ब्रँडचे कपडे, जोडे ‍किंवा कॉस्मेटिक्स आपल्याला सूटवर इतर कुठल्या दुकान कमी किमतीत खरेदी करता येऊ शकणे शक्य असल्यास त्या वस्तू तेथून घ्यावा. या साठी सर्वप्रथम शक्य तितकी माहिती मिळवून खरेदी करण्याची खात्री करा.
 
* कंटाळा आल्या असल्यास काही ही करा पण खरेदी करू नका - 
जेव्हा आपण कंटाळता तेव्हा मोबाइलवर गेम खेळा, चित्रपट बघा, काही नवीन खायला बनवा, पण खरेदारी करू नका. या पैकी सर्वात जास्त धोकादायक भावनात्मक खरेदी करणं आहे. ज्या मुळे आपले सर्वात अधिक पैसे खर्च होतात. अशा प्रकारच्या खरेदी करण्याचे एक नुकसान आहे की या वेळी घेतल्या जाणाऱ्या वस्तू अशा असतात ज्यांचा वापर कधी केला जाणार नाही.
 
* ऑनलाईन पर्याय बघावे - 
आजकाल बऱ्याच ब्रँडमध्ये अशा वेबसाइट्स देखील असतात, ज्यामधून कपड्यांना ऑनलाईन ऑर्डर करता येऊ शकतं. या वेबसाइट्सवर चांगली सूट देखील उपलब्ध आहेत. या प्रकरणात आपण स्टोअर मधील कपडे ट्राय करू शकता. जर आपल्याला स्टोअर मध्ये आपल्या योग्य आकाराचे कपडे सापडल्यास, आपण या कपड्यांना ऑनलाईन शोधावे. जर हे कपडे ऑनलाईन वर स्वस्त असल्यास त्यांना वेबसाइट वरूनच मागवावे.
 
* खरेदी करण्यासाठी योग्य भागीदार असणं देखील महत्त्वाचे आहे -
बऱ्याच वेळा असे ही होत की जी व्यक्ती आपल्यासह खरेदी करण्यासाठी गेलेली असते ती देखील आपल्या होणाऱ्या पैशाचा अपव्यवासाठी जवाबदार असते. ती व्यक्ती आपल्याला वारंवार काही नवीन दाखवत असल्यास आणि आपल्याला ते घेण्यासाठी म्हणत असल्यास की ते घेणं चांगले होईल किंवा आपल्याला एखाद्या वस्तूवर सूट मिळत असल्यास अधिक वस्तू खरेदी करण्याचा सल्ला देत असेल तर पुढच्या वेळी त्या व्यक्ती बरोबर खरेदारीला न जाणेच अधिक योग्य ठरेल. आपण अशा व्यक्तींसह खरेदी करण्यासाठी जावं जे आपल्याला अवास्तव खर्च करण्यापासून रोखेल आणि आपल्याला काय घेणं महत्त्वाचे आहे या साठी आपले लक्ष केंद्रित करेल.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

हितोपदेशातील कहाणी ; आंधळा गिधाड आणि दुष्ट मांजर

Mesh Rashi Varshik Rashifal 2025 in Marathi : मेष रास 2025 राशिभविष्य: नवीन वर्ष कसे असेल, निश्चित उपाय जाणून घ्या

26 नोव्हेंबरपासून बुध दोषामुळे त्रास होईल, या क्षेत्रांवर नकारात्मक परिणाम होईल !

Premature Graying Hair मुलांचे केस आतपासूनच पांढरे होऊ लागले आहेत का? त्यांना हे 5 पदार्थ खाऊ द्या, केस नैसर्गिकरीत्या काळे होतील

कपालभाती प्राणायाम दररोज केल्याने हे 10 आरोग्य फायदे होतात, जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

Tuesday Born Baby Girl Names मंगळवारी जन्मलेल्या मुलींसाठी शुभ नावे

Tuesday Born Baby Boy Names मंगळवारी जन्मलेल्या मुलांसाठी शुभ नावे

हिवाळा विशेष : चिकन सूप बनवण्याची सोप्पी पद्धत

वाट पाहणारं दार

वयानुसार दररोज किती मिनिटे चालावे?

पुढील लेख
Show comments