Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

साक्षात्कार

साक्षात्कार
, शनिवार, 5 फेब्रुवारी 2022 (09:45 IST)
मोठ्या धावपळी नंतर तो कार्यालयात पोहचला, त्यांची आज पहिली मुलाखत, म्हणजेच इंटरव्यूह होता.
तो घराबाहेर निघतांना विचार करीत होता व त्याची इच्छा होती ! जर आज माझी मुलाखत यशस्वी झाली तर माझ्या पूर्वजांची हवेली सोडून, येथे शहरात स्थाईक होईल .
 
सकाळी झोपेतून उठल्या पासून ते परत झोपे पर्यंत आई- वडिलांच्या रोजच्या कटकटी पासून मुक्तता मिळेल.
 
सकाळी झोपेतून उठलो की अगोदर अंथरूण आवरा .
मग बाथरूम मध्ये जा , बाथरूमच्या बाहेर निघत नाही कि मातोश्रीचे फर्मान "नळ बंद केला का  ?"
टॉवेल जागेवर ठेवला की दिला फेकून ?
 
नाश्ता करून घरा बाहेर निघालो की लगेच वडिलांचा आवाज 
"पंखा बंद केला की चालूच आहे ?"
 
काय काय ऐकावे नुसता वैताग आला यार...
नौकरी मिळाली की घर सोडून देईल व शहरात राहील..!
 
ऑफिसमध्ये भरपूर उमेदवार बसलेले होते, बॉसची वाट पाहत होते, दहा वाजलेले होते तरीपण वरहांड्यात अजूनही लाईट चालूच होता, लगेच आईची आठवण आली, लाईट बंद केला का ?
अन उठून मी लाईट बंद केला...
 
ऑफिसच्या  दाराजवळ कोणीच नव्हते , बाजूला ठेवलेल्या वाटर कूलर मधून पानी टपकत होते,
ते पाहून वडीलांचे रागावणे आठवले , म्हणून वॉटर कुलरचा नळ व्यवस्थित बंद केला गळणारे पाणी बंद केले ,
समोर बोर्ड वर लिहिलेले होते तुमचा इंटरव्यू दुसर्‍या मजल्यावर आहे....
 
जिन्यातील लाइट चालूच होता तो बंद करून पुढे सरकलो, तर रस्त्यात एक खुर्ची पडलेली होती ती जागेवर व्यवस्थित उभी केली व वरच्या मजल्यावर पोहोचलो व पाहिले की आपल्या अगोदर बसलेले उमेदवार बॉसच्या कॅबिन मध्ये जात होते व लगेच बाहेर पडत होते....
 
तेथे मुलाखत देऊन बाहेर आलेल्या उमेदवारास विचारल्या वर कळले की , बॉस फाइल पाहून काहीच प्रश्न विचारत नव्हते आणि परत पाठवून देत होते, असे समजले.
 
माझा नंबर आला व मला मुलाखती साठी बोलावले  मी दरवाजा वाजवून विचारले.. , आत येऊ का सर ? 
"यस, कम इन " आतून आवाज आला . बसण्यासाठी सूचना मिळाल्यानतंर खुर्चीवर बसलो आणि माझी फाईल पुढे केली,
फाईल मधील माझ्या कागदपत्रावर नजर मारत असताना कोणताही प्रश्न न विचारता बॉसने मला विचारले  "केव्हा ज्वाइन करत आहात ?"
 
बॉसच्या या प्रश्नाने मी चक्रावलो मला वाटले.. ते माझी गंमत करत आहेत, माझा चेहरा पाहून, ते म्हणाले मी गंमत करीत नाही ही वास्तविकता आहे .
 
आजच्या इंटरव्यूत कोणालाही कोणताच प्रश्न विचारला नाही, फक्त सीसीटीव्ही (CCTV) मधील इंटरव्यू मध्ये आलेल्या उमेदवारांच्या हालचाली मध्ये सर्व काही पाहिले, मुलाखती साठी बरेचजण आले, वॉटर कुलरचे गळणारे पाणी सर्वानी पाहीले पण त्याकडे त्या सर्वांनी दुर्लक्ष केले, वऱ्हरांड्यातील जळणारा लाईट कोणीच बंद केला नाही, तो लाईट तुम्ही बंद केला .
मध्येच रसत्यात पडलेली खुर्ची सर्वांनी पाहीली पण दुर्लक्ष केले. परंतु ती खुर्ची तुम्ही उचलली .
 
धन्य तुमच्या पालकांना, ज्यांनी तुम्हाला चांगले व उत्तम संस्कार केले. ज्यांच्या जवळ Self Discipline नाही, तो कितीही हूशार असला, चतुर असला तरी ती व्यक्ती मैनेजमेंट आणि  जीवनातील घौडदौडीत यशस्वी होऊ शकत नाही. 
 
घरी जाऊन आई वडीलांच्या गळ्यातच पडलो आणि त्यांची माफी मागून त्यांना सर्व काही सांगितले तुम्ही केलेल्या संस्कारामुळेच आज मला ही नौकरी मिळाली .
 
आपल्या जीवनात रोज रोज लहान सहान गोष्टींवर बोलणारे ,नेहमी सूचना देणारे आई वडीला यांच्याकडून मला जी शिस्त मिळाली ती अनमोल आहे . या संस्कारक्षम शिस्तप्रीय संस्कारा पुढे मी मिळवलेली पदवीची काहीच हैसियत नाही.
 
जीवनात फक्त शिक्षणच महत्त्वाचे नाही तर त्यासोबत आई वडीलांची शिकवण व संस्कार महत्त्वाचे आहेत...
 
-सोशल मीडिया

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

फुफ्फुस निरोगी ठेवण्यासाठी दररोज हे एक आसन करा