Webdunia - Bharat's app for daily news and videos

Install App

केक करत आहे, मग ही काळजी घ्या.....

Webdunia
केक खाताना केकच्या एखाद्या किंवा काही तुकड्यांवर समाधान मानावं लागतं. तो केक खाताना छान हलका-फुलका लागला की केक करताना केलेल्या सर्व कष्टांचं अगदी चीज झाल्यासारखं वाटतं. केक जमला या समाधानानंच पोट भरतं. केक म्हणजे कसोटी पाहणारा पदार्थ. तो जर नीट जमला नाही तर केवळ केक बिघडला म्हणूनच हिरमोड होतो, असं नाही तर ज्या प्रसंगासाठी केक करण्याचा घाट घातलेला असतो त्यातला आनंदच निघून जातो. केक करायचा म्हणजे तुमच्याकडे निवांत काही तास असले पाहिजेत. चिरली भाजी आणि घातली फोडणी अशी घाई केकमध्ये करून चालत नाही. केकचा प्रत्येक टप्पा अगदी काळजीपूर्वकच पार करावा लागतो. सरावानं केक चांगला जमतो. तरीही केक करताना काही गोष्टी लक्षात ठेवल्या तर अगदी नवख्यांचाही केक छान होतो.

सर्वसाधारणपणे मैदा, मीठ व बेकिंग पावडर हे घटक तीन वेळा चाळून घेण्यास सांगितलेलं असतं. त्याचं कारण असं की, तीन वेळा चाळल्यामुळे सर्व घटकांचं मिश्रण एकजीव होतं आणि थोडी हवाही त्यात मिसळते. हे कोरडं मिश्रण केकमध्ये सर्वात शेवटी घालायचं असतं आणि त्यानंतर फार घुसळायचं नसतं. फार घुसळल्यास निर्माण झालेला वायू निघून जाण्याची शक्यता असते. जास्त ग्लुटेन होण्याचीही भीती असते कारण तसं झालं तर केक कडक होऊ शकतो. म्हणून कोरडे घटक सर्वात शेवटी हलक्या हातानं मिक्स करायचे असतात.

केकसाठी लागणारे सगळे घटक खोलीच्या तपमानाला असले पाहिजेत. केक भाजत असताना कोणते रासायनिक बदल त्यात घडणार आहेत याचा विचारकरून त्याच्या कृती दिलेल्या असतात. त्यामुळे त्या तंतोतंत पाळाव्यात. केक ओव्हनमध्ये ठेवण्यापूर्वी ओव्हनचं तपमान कृतीत सांगितल्याप्रमाणे ठेवून आधी तापवून घ्यावं.

ज्या भांड्यात केक करायचा असेल त्याला लोणी किंवा तूप लावून त्यात थोडा मैदा भुरभुरावा. त्यामुळे केक भांड्याला चिकटत नाही. सगळ्यात उत्तम म्हणजे भांड्यात बटरपेपर घालावा. बटरपेपर घालताना काही वेळा तो भांड्याच्या कडेला नीट उभा रहात नाही. अशा वेळी भांड्याला पुसट तुपाचा हात सर्व बाजूंनी फिरविला तर बटरपेपर चिकटून व्यवस्थित उभा रहातो.

सेल्फ रायझिंग फ्लोअरमध्ये बेकिंग पावडर आधीच घातलेली असते. एखाद्या कृतीत असं पीठ वापरायचं असल्यास ते मुद्दाम बाजारातून मिळवण्याची किंवा बाजारात जाऊन शोधण्याची गरज नाही. १00 ग्रॅम मैद्यात १ टीस्पून बेकिंग पावडर आणि चिमूटभर मीठ घातलं की तसं पीठ तयार होतं.
केकचं मिश्रण फार घट्ट झालं तर तो फुगत नाही. पातळ झालं तर सुरुवातीला फुगतो आणि मग खाली बसतो. केकच्या मिश्रणात चमचा पूर्ण बुडवून बाहेर काढून उलटा केल्यावर जर मिश्रण काही सेकंद चिकटून राहिलं आणि मग खाली पडलं तर ते योग्य आहे, असं समजावं. केक झाला की नाही हे पाहण्यासाठी सुरीचं स्वच्छ पातं केकच्या मध्याच्या जरा बाजूला केकमध्ये तळापर्यंत उभं घालावं व लगेच काढावं. जर स्वच्छ असेल तर केक झाला.

सुरीला मिश्रण चिकटलं असेल तर केक आणखी थोडा वेळ भाजावा लागेल.केकमध्ये साखर वापरताना मिक्सरमध्ये थोडी बारीक (पिठीसाखर नव्हे) करून घ्यावी म्हणजे ती लोण्यात लवकर विरघळेल. लोणी आणि साखर घुसळताना त्यात हवा मिसळून मिश्रण फुगलेलं दिसेपर्यंत, त्यातली साखर पूर्ण विरघळेपर्यंत घुसळावं.

सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे केक बनवणं हे कौशल्याचं काम आहे. पण त्यासाठी अंडं लागतंच असं नाही. अंड्याशिवायही केक आणि बिस्किटं उत्तम होतात.

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

Ekadashi 2025 Wishes in Marathi एकादशीच्या शुभेच्छा मराठीत

Vasant Panchami 2025: वसंत पंचमीला एक अद्भुत योगायोग घडत आहे, ३ राशींना मिळणार अपार लाभ !

४ फेब्रुवारीपासून ३ राशींचे भाग्य चमकेल, गुरु चालणार सरळ

चमकदार त्वचा आणि निरोगी केसांसाठी हिवाळ्यातील 10 घरगुती उपाय जाणून घ्या

वर्तमानपत्रात गुंडाळलेली फळे अनेक आजारांना कारणीभूत ठरू शकतात जाणून घ्या

सर्व पहा

नवीन

डोळ्यांखालील त्वचेची काळजी घेण्यासाठी कॉफी आईस क्यूब लावा

हिवाळ्यात मक्याची रोटी खायला आवडत असेल तर या चुका टाळा

मधुमेहासाठी 5 योगासन, जाणून घ्या सोप्या टिप्स

नैतिक कथा : मांजरीच्या गळ्यातल्या घंटाची कहाणी

अंडी फ्राय राईस रेसिपी

पुढील लेख
Show comments