Festival Posters

जन्माष्टमी स्पेशल गुळाची खीर रेसिपी

Webdunia
शनिवार, 24 ऑगस्ट 2024 (07:00 IST)
जन्माष्टमी हा दिवस भगवान श्रीकृष्णाचा जन्मदिवस असून गोकुळाष्टमी म्हणूनही ओळखला जातो. तसेच या दिवशी श्रीकृष्णाला वेगवगेळे नैवेद्य अर्पण केले जातात. तसेच काही ठिकाणी छप्पन प्रसाद दिला जातो. याकरिता आपण जन्माष्टमी स्पेशल नैवेद्यायात गुळाची खीर पाहणार आहोत. तर चला जाणून घ्या रेसीपी 
 
साहित्य-
1 लिटर दूध
10 चिरलेले बदाम
10 चिरलेले काजू
1 चमचा वेलची पूड 
80 ग्रॅम तांदूळ 2 तास पाण्यात भिजवलेले 
3/4 कप किंवा 150 ग्रॅम गूळ
 
कृती-
सर्वात आधी 1 लिटर दूध उकळण्यासाठी ठेवावे. आता दुधात भिजवलेले तांदूळ घालावे. तांदूळ दुधात मऊ होईपर्यंत शिजवा. तसेच दूध पातेलीच्या तळाशी बसणार नाही म्हणून ढवळत राहावे. आता दुसऱ्या पातेलीत अर्धी वाटी पाणी टाका आणि त्यात गूळ टाका व गूळ वितळून घ्या. दुधात तांदूळ पूर्ण शिजल्यावर त्यात  बदाम, काजू आणि वेलची पूड घालून मिक्स करा.
 
आता गॅस बंद करावा. खीर थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवा. यामध्ये  गूळ घालून चांगले मिक्स करावे. गरम खीरमध्ये गूळ घालू नका, असे केल्याने दूध फाटू शकते. आता खीर भांड्यांमध्ये काढून घ्यावी. व यामध्ये ड्रायफ्रुट्स घालून सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

सर्व पहा

नक्की वाचा

अधिक मास कधीपर्यंत असेल? या पवित्र महिन्यात या ५ शुभ गोष्टी केल्यास तुमचे भाग्य उजळेल

देवाला अर्पण केलेल्या वस्तूंचा पुनर्वापर करता येतो का? जाणून घ्या शास्त्रानुसार याचे नियम

Career in BSc in Respiratory Therapy : बीएससी इन रेस्पिरेटरी थेरपी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

त्वचेसाठी तुरटीचे हे आश्चर्यकारक फायदे जाणून घ्या

महागड्या स्प्रेपेक्षा घरगुती उपाय जास्त प्रभावी; आरसे स्वच्छ करण्याची योग्य आणि सोपी पद्धत येथे पहा

सर्व पहा

नवीन

पाहुणे मंडळींसाठी झटपट नाश्ता; बनवा चविष्ट पालक भजी

रक्त घट्ट होण्याची प्रमुख लक्षणे, आजार, कारणे आणि उपचार

Career in Bsc in neurophysiology technology :बीएससी इन न्यूरोफिजियोलॉजी टेक्नॉलॉजी कोर्स मध्ये कॅरिअर करा, पात्रता जाणून घ्या

चेहऱ्यावर बॉडी लोशन लावण्याचे तोटे

मधुमेहींनी नारळाचे पाणी केव्हा प्यावे?

पुढील लेख
Show comments